राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्याकडून मंगल अक्षतांचे वितरण
By योगेश पांडे | Published: January 9, 2024 10:30 PM2024-01-09T22:30:15+5:302024-01-09T22:30:30+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच विविध संघटनांच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून मंगल अक्षत वितरण सुरू आहे.
नागपूर : अयोध्येतील श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नागपुरातील घरोघरी गृहसंपर्काच्या माध्यमातून मंगल अक्षत वितरण मोहीम सुरू आहे. या मोहीमेत मंगळवारी राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्कादेखील सहभागी झाल्या व त्यांनी शहरातील काही मान्यवरांच्या घरी जाऊन त्यांना मंगल अक्षतांचे वितरण केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच विविध संघटनांच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून मंगल अक्षत वितरण सुरू आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांच्या घरी जाऊन याचे वितरण झाले आहे. मंगळवारी यात शांताक्का स्वत: सहभागी झाल्या. त्यांनी रामदासपेठ येथील ओमप्रकाश जाजुदिया, डॉ.सुनिल गुप्ता, डॉ.उदय माहूरकर, डॉ.प्रमोद गिरी यांच्या घरी जाऊन अक्षतांचे वितरण केले.
त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथील नंदकिशोर सारडा, सिव्हील लाईन्स येथील श्रीराम शर्मा, बॅडमिंटन खेळाडू मालविका बन्सोड, राजेंद्र पुरोहित यांच्या घरीदेखील अक्षतांचे वितरण केले. यावेळी शांताक्का यांनी मान्यवरांच्या कुटुंबियांशी संवाद साधत राममंदिराबाबत माहितीदेखील दिली.