घरबसल्या अकरा हजाराहून अधिक भाग नकाशांचे वाटप; एनएमआरडीएची ऑनलाईन सुविधा

By गणेश हुड | Published: March 19, 2024 04:30 PM2024-03-19T16:30:12+5:302024-03-19T16:31:19+5:30

नागपूर महानगर विकास प्राधिकरणाची भाग नकाशा ऑनलाईन प्रणाली सुरु करण्यात आली आहे.

distribution of more than eleven thousand area maps at home online facility of nmrda | घरबसल्या अकरा हजाराहून अधिक भाग नकाशांचे वाटप; एनएमआरडीएची ऑनलाईन सुविधा

घरबसल्या अकरा हजाराहून अधिक भाग नकाशांचे वाटप; एनएमआरडीएची ऑनलाईन सुविधा

गणेश हूड, नागपूर : नागपूर महानगर विकास प्राधिकरणाची भाग नकाशा ऑनलाईन प्रणाली सुरु करण्यात आली आहे. भाग नकाशासाठी जाने २३ ते १८ मार्च २०२४ या कालावधीत १२ हजार २३० अर्ज प्राप्त झाले होते. यातील ११ हजार ७३६ अर्जधारकांना घरबसल्या विकास योजना भाग नकाशे ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले आहे.  ज्या ४९४ व्यक्तींना कागदपत्रे अपूर्ण असल्याकारणाने भाग नकाशे पुरविता आलेली नाहीत, त्यांना त्याबाबत ऑनलाईन पद्धतीने त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत.

नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) यांनी भाग नकाशा, गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे गरजुंना घरबसल्या  भाग नकाशा मिळत आहे. गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. भाग नकाशासाठी  एनएमआरडीए यांच्याकडे १२ हजार २३० हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.

सदर संकेतस्थळावर ऑनलाईन पोच पावती मिळाल्यापासुन तीन दिवसाचे कालावधीत ऑनलाईन भाग नकाशा हा संबंधितांचे ई-मेल आयडी वर पाठविल्या जातो. तसेच, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सदर भाग नकाशा व्हॉटसअॅप  व स्पीड पोस्ट ने पाठविण्याची सुद्धा कार्यवाही सुरू केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना जलदगतीने भाग नकाशा उपलब्ध होईल, सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी मध्ये भाग नकाशा उपलब्ध हाईल. भाग नकाशा मिळण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा http://www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: distribution of more than eleven thousand area maps at home online facility of nmrda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर