मांज्यामुळे गळा कापू नये म्हणून सुरक्षा बेल्टचे वाटप
By मंगेश व्यवहारे | Published: January 13, 2024 04:48 PM2024-01-13T16:48:35+5:302024-01-13T16:48:49+5:30
अजनी पोलीसांच्या सहकार्याने यावेळी मांज्या गळ्यात अटकू नये म्हणून सुरक्षा बेल्ट दुचाकीचालकांना वाटण्यात आले
नागपूर : पतंग उत्सवाच्या काळात नायलॉन मांज्यामुळे दरवर्षी मोठे घातपात होतात. खासकरून दुचाकी चालविणाऱ्यांच्या गळ्यात मांजा फसून मोठा अपघात होऊन जीवही जावू शकतो. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या दिवशी दुचाकी चालविताना विशेष काळजी घ्यावी आणि नायलॉन मांज्याच्या विक्रीवर निर्बंध लावावे या मागणीसाठी दक्षिण नागपुरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांतर्फे शताब्दी चौकात जनजागृती करण्यात आली.
अजनी पोलीसांच्या सहकार्याने यावेळी मांज्या गळ्यात अटकू नये म्हणून सुरक्षा बेल्ट दुचाकीचालकांना वाटण्यात आले. कुणीही नायलॉन मांज्याचा वापर करू नये असाही संदेश देण्यात आला. यावेळी काँग्रेस पर्यावरण सेलचे प्रमुख मनिष चांदेकर, माजीनगरसेवक मनोज गावंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर, मंगेश ढबाले, विलास राऊत, शिषिर विल्सन, जितेंद्र खंडागळे, विक़्की वर्मा, बाळू पांढुरकर, रोषण तितरमारे, राहुल वर्मा, छोटू शाहू, ज़येष चौधरी आदी उपस्थित होते.