‘सूर ज्योत्स्ना’ राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे आज वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 06:40 AM2019-03-23T06:40:42+5:302019-03-23T06:41:30+5:30
सुमधूर आवाज आणि सांगितिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना यंदाच्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९’ने गौरविण्यात येणार आहे.
नागपूर : सुमधूर आवाज आणि सांगितिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना यंदाच्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९’ने गौरविण्यात येणार आहे.
लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९ चे वितरण आज शनिवारी, २३ मार्च रोजी नागपुरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ६ वाजता होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा राहतील.
संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. देशभरातील संगीत प्रतिभांना शोधून त्यांना प्रोत्साहित करणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश असून मागच्या पाच वर्षात या मंचने अनेक कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भावी वाटचालीकरिता प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.
आर्या आंबेकर, शिखर नाद कुरेशींना पुरस्काराने गौरविणार
या भव्य समारंभात आपल्या सुमधूर आवाजाने महाराष्टÑावर जादू करणारी ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना ‘सूर ज्योत्स्ना अवॉर्ड-२०१९’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
श्रेया घोषाल ‘लाईव्ह कॉन्सर्ट’
चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह पाच फिल्मफेअर आणि २०१८ चा लोकमत महाराष्टÑीयन आॅफ दि इयर पुरस्कारप्राप्त गायिका श्रेया घोषाल यांचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ कार्यक्रम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.