सैनिक कुटुंबीयांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:22+5:302020-12-08T04:09:22+5:30

नागपूर : जवान अहोरात्र पहारा देतात म्हणून देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. त्यांच्यासाठी सढळ हस्ते सशस्त्र ध्वजदिन निधी संकलित करत ...

District administration with the support of soldier families | सैनिक कुटुंबीयांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन

सैनिक कुटुंबीयांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन

Next

नागपूर : जवान अहोरात्र पहारा देतात म्हणून देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. त्यांच्यासाठी सढळ हस्ते सशस्त्र ध्वजदिन निधी संकलित करत संपूर्ण देश खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश पोहचणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन सैनिकांच्या कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सैनिक कुटुंबीयांना आश्वस्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त संदीप पखाले, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा सैनिक अधिकारी माजी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, कल्याण संघटक सत्येंद्रकुमार चौरे यावेळी उपस्थित होते.

सैनिक सीमेचे रक्षण करण्यासह दहशतवादी, मानवी आणि नैसर्गिक आपत्तीशी लढा देत असतात. त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. वीर जवानांच्या कुटुंबांच्या अडी-अडचणी सोडविणे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दरवर्षी ७ डिसेंबरपासून ध्वजदिन निधी संकलनाला सुरुवात होते. ते पुढील वर्षीच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत संकलन केले जाते. गतवर्षी नागपूर विभागातून १ कोटी ८३ लाख ५७ हजार रुपये निधीचे संकलन करण्यात आले असून ५० टक्के उद्दिष्टपूर्ती झाली होती. देशाच्या सीमेचे प्रतिकूल परिस्थितीत रक्षण करताना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत ही भावना व्यक्त व्हावी यासाठी यावर्षी ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट शंभर टक्के व्हावे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन अंजली रत्नाकर ठाकरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. खरपकर यांनी केले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *माजी सैनिक व पाल्यांचा विशेष गौरव

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते माजी सैनिक व पाल्यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यामध्ये इयत्ता दहावीमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल आदिती दवणे, हर्षल तांबटकर, लोकेश पराते तर बारावीमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल अपूर्वा कडव, प्रथम कांबळे यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते धनादेश तसेच प्रशस्तीपत्र देण्यात आले. क्रीडा प्रकारात प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल माजी सैनिक अकरम खान यांना गौरविण्यात आले.

युध्दजन्य परिस्थितीव्यतिरिक्त सैन्य सेवेत असताना मृत्यू झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींना ७५ हजारांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. यामध्ये संजीवनी मारुती येवले, नीलिमा प्रदीप गुरव, स्नेहा दुर्वेश बडोले, वैशाली अजय घोरपडे, किश्र्वर शेख यांना यावेळी धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच दिवंगत शिपाई प्रशांत इरपाते यांच्या माता मैना इरपाते यांना धनादेश देण्यात आला.

Web Title: District administration with the support of soldier families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.