जिल्ह्यातील आशा, गटप्रवर्तक बेमुदत संपावर
By मंगेश व्यवहारे | Published: October 18, 2023 08:03 PM2023-10-18T20:03:10+5:302023-10-18T20:03:39+5:30
बुधवारी आयटकच्या नेतृत्वात संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
नागपूर: आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन द्यावे, गटप्रवर्तकांना ८४५० रुपये स्वतंत्र प्रवास भत्ता द्यावा. ऑनलाइनचे सक्तीने काम देणे बंद करावे, दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना किमान पाच हजार रुपये दिवाळी भाऊबीज द्यावी यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी बेमुदत संप पुकारला आहे.
बुधवारी आयटकच्या नेतृत्वात संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांना बेमुदत संपाचे निवेदन सादर केले. आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते श्याम काळे यांनी केले. आंदोलनात मंगला पांडे, मंगला लोखंडे, संगीता गौतम, सोनू कुकसे, अरुण वनकर, ज्योती अंडरसहारे, जयश्री चंहादे, सविता चौधरी, सुकेशनी फुलपाटील, उषा लोखंडे, शीतल कळमकर, मोहिनी बालपांडे, ज्योती रक्षित, पौर्णिमा वासे आदींचा समावेश होता.