जिल्हाधिकाऱ्यांनी नगर रचना अधिकाऱ्यांना फटकारले
By Admin | Published: June 3, 2016 03:02 AM2016-06-03T03:02:17+5:302016-06-03T03:02:17+5:30
सिव्हिल लाईन येथील प्रशासकीय इमारतीतील नगर रचना विभागाच्या कार्यालयासंदर्भात असलेल्या लोकांच्या तक्रारींची दखल घेत
तक्रारींची दखल : नगर रचना कार्यालयाची आकस्मिक तपासणी
नागपूर : सिव्हिल लाईन येथील प्रशासकीय इमारतीतील नगर रचना विभागाच्या कार्यालयासंदर्भात असलेल्या लोकांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गुुरुवारी सायंकाळच्या सुमारास या कार्यालयाला आकस्मिक भेट देऊ न तपासणी केली. निर्देशानंतरही त्रुटी आढळून आल्याने विभागातील नगर रचना अधिकारी (विभाग-२) विनायक ठाकरे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.
नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू केंद्राला या विभागामार्फत एसएमएस पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु निर्देशानुसार कार्यवाही होत नसल्याने कुर्वे यांनी या कार्यालयाला आकस्मिक भेट देऊ न कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगणकांची तपासणी केली. कामकाजात त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी ठाकरे यांना चांगलचे फटकारले. इतर अधिकाऱ्यांनाही जाब विचारून कारवाईची तंबी दिली. यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. दरम्यान, नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांना अपशब्दात बोलून अपमान केल्याने याविरोधात शुक्र वारी सकाळी कार्यालयापुढे निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली. (प्रतिनिधी)
विभागात दलालांचे राज्य
नगर रचना विभागात दलालांचे राज्य असून, या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिक ांना वेठीस धरले जाते. याबाबतच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या विभागाची आकस्मिक तपासणी केली.
दोषी आढळल्यास कारवाई
शहरातील नागरिकांची प्रकरणे तातडीने निकाली निघावीत, यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. परंतु नगर रचना विभागासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असल्याने या कार्यालयाची आकस्मिक तपासणी केली. तक्रारींची चौकशी सुरू आहे. यात दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल.
- सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी