जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना ‘जलयुक्त शिवार’चा पुरस्कार

By admin | Published: April 16, 2017 01:34 AM2017-04-16T01:34:44+5:302017-04-16T01:34:44+5:30

जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल नागपूरचे जिल्हाधिकरी सचिन कुर्वे यांना २०१५-१६ या वर्षासाठी विभागीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

District Collector Sachin Kurwe received the award for 'Jalakit Shivar' | जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना ‘जलयुक्त शिवार’चा पुरस्कार

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना ‘जलयुक्त शिवार’चा पुरस्कार

Next

नागपूर : जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल नागपूरचे जिल्हाधिकरी सचिन कुर्वे यांना २०१५-१६ या वर्षासाठी विभागीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने या पुरस्काराची घोषणा केली आहे.
जलयुक्त शिवार हे राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. संपूर्ण राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी या अभियानाला अतिशय महत्त्व दिले जात आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड हे तालुके डार्क झोनमध्ये आले होते. संत्रा पीक नष्ट होण्याच्या मार्गावर होते. अशा वेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुढाकार घेऊन जलयुक्त शिवारअंतर्गत संपूर्ण यंत्रणेला कामाला लावले. जलयुक्त शिवारच्या कामामुळे या दोन तालुक्यातील खाली गेलेली भूजल पातळी वर आली.
यासोबतच हिंगणा आणि रामटेकमध्ये सुद्धा अतिशय चांगले काम करण्यात आले.
याचे सर्व श्रेय हे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना जाते. त्यामुळेच जलयुक्त शिवारअंतर्गत नागपूर विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District Collector Sachin Kurwe received the award for 'Jalakit Shivar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.