जिल्हा न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:19 AM2020-04-23T10:19:15+5:302020-04-23T10:19:38+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयानेही स्वत:सह त्यांच्या अधिपत्याखालील सर्व न्यायालयांच्या उन्हाळी सुट्या रद्द केल्या आहेत. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी बुधवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले.

District Court cancels summer vacation | जिल्हा न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या रद्द

जिल्हा न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या रद्द

googlenewsNext
ठळक मुद्दे लॉकडाऊन हटल्यास नियमित कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयानेही स्वत:सह त्यांच्या अधिपत्याखालील सर्व न्यायालयांच्या उन्हाळी सुट्या रद्द केल्या आहेत. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी बुधवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले.
सुट्या रद्द करण्याचा निर्णय लॉकडाऊनवर अवलंबून आहे. सरकारने ३ मेनंतर व ७ जूनपूर्वी लॉकडाऊनचा आदेश मागे घेतला तरच, सुट्या रद्द करून जिल्हा व सत्र न्यायालय आणि त्या अधिपत्याखालील सर्व न्यायालयांमध्ये नियमित स्वरूपात कामकाज सुरू केले जाणार आहे. नियमित कामकाज सुरू झाल्यास कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ तर, न्यायालयीन कामकाजाची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अशी राहील. दुपारी २ ते २.३० ही वेळ विश्रांतीची राहील.

 

Web Title: District Court cancels summer vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.