जिल्हा नियोजन समितीची बैठक आता १५ जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:06 AM2021-01-10T04:06:51+5:302021-01-10T04:06:51+5:30
नागपूर : जिल्हा नियोजन समिती सभा आता शुक्रवार, १५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता सिव्हील लाईन्स येथील डॉ. ...
नागपूर : जिल्हा नियोजन समिती सभा आता शुक्रवार, १५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य-सचिव तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.
यापूर्वी ही बैठक १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार सभेची तारीख बदलविण्यात आली आहे. या वर्षातील ही महत्त्वपूर्ण बैठक असून या बैठकीमध्ये पुढील वर्षाच्या नियतव्ययावर देखील चर्चा होणार आहे. तसेच या वर्षी झालेल्या खर्चाचा आढावा देखील या बैठकीत घेतला जाणार आहे. कोरोना काळामध्ये अनेक विभागांमार्फत झालेल्या खर्चाचा व पुढील वर्षासाठी केलेल्या नियोजनासंदर्भात यापूर्वी अंतर्गत समितीच्या दोन बैठका घेऊन पालकमंत्र्यांनी आढावा घेतला होता. आता १५ जानेवारीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय होणार आहेत.