स्वतंत्र विदर्भासाठी आज दिल्लीत धरणे
By admin | Published: March 31, 2016 03:19 AM2016-03-31T03:19:19+5:302016-03-31T03:19:19+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ३१ मार्च रोजी जंतरमंतर दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ३१ मार्च रोजी जंतरमंतर दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात सर्वच विदर्भवादी नेत्यांना सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यापैकी अॅड. श्रीहरी अणे यांच्यासह अनेक नेत्यांनी सामील होण्याचे मान्य केले आहे.
धरणे आंदोलनानंतर विदर्भवादी नेते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग यांना भेटून मागण्यांचे निवेदन देण्यात येईल.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसोबतच उत्पादन खर्च अधिक ५० टक्के लाभ एवढा हमी भाव शेतकऱ्यांना कधी देणार, विदर्भातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केव्हा करणार, विदर्भातील कृषीपंपाचे लोडशेडिंग केव्हा संपणार, नागपूर करारानुसार विदर्भातील निर्माण झालेले चार लाख नोकऱ्यांचे बॅकलॉग केव्हा भरणार, विदर्भातील विजेचे दर निम्मे कधी होणार आदी प्रश्न केंद्र सरकारला धरणे आंदोलनादरम्यान विचारण्यात येणार असल्याचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)