नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या मनुष्यबळाचेही विभाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:42 PM2018-09-05T12:42:58+5:302018-09-05T12:48:11+5:30

लोहमार्ग पोलिसांचा औरंगाबाद हा स्वतंत्र घटक (एसपी कार्यालय) अस्तित्वात आला असलातरी त्यासाठी अद्याप नव्याने मनुष्यबळ, साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागपूर घटकातील मनुष्यबळाचे विभाजन करून तूर्त औरंगाबादचे कामकाज चालविले जाणार आहे.

Division of the Nagpur Railway police | नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या मनुष्यबळाचेही विभाजन

नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या मनुष्यबळाचेही विभाजन

googlenewsNext
ठळक मुद्देनवे औरंगाबाद घटक ६७६ अधिकारी-कर्मचारी४६ लिपिकवर्गीय यंत्रणेचा समावेश

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोहमार्ग पोलिसांचा औरंगाबाद हा स्वतंत्र घटक (एसपी कार्यालय) अस्तित्वात आला असलातरी त्यासाठी अद्याप नव्याने मनुष्यबळ, साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागपूर घटकातील मनुष्यबळाचे विभाजन करून तूर्त औरंगाबादचे कामकाज चालविले जाणार आहे.
लोहमार्ग पोलिसांचे पुण्यात आयुक्तालय आहे. तर नागपूरला घटक प्रमुख (एसपी) कार्यालय आहे. आता त्यात औरंगाबाद या नव्या एसपी कार्यालयाची भर पडली आहे. १० मे २०१८ रोजी या संबंधीचा आदेश जारी केला गेला. त्यासाठी नव्याने यंत्रणा, साधन सामुग्री उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात नागपूर पोलीस लोहमार्ग घटकातील यंत्रणेचे विभाजन करण्यात आले आहे. त्यात ६७६ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे औरंगाबाद घटकात वर्ग करण्यात आली. त्यामध्ये उपअधीक्षक तीन, निरीक्षक आठ, सहायक निरीक्षक १९, उपनिरीक्षक २६, सहायक फौजदार ६७, जमादार १६५, पोलीस नाईक १०७ तर २८१ पोलीस शिपायांचा समावेश आहे. याशिवाय लेखाधिकारी, लिपिक, चपराशी, स्वयंपाकी, मोची, टेलर, सफाई कामगार, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता, ड्रेसर, वॉर्डबॉय यांची ४६ पदे वर्ग करण्यास मंजुरी मिळाली आहे. औरंगाबादला मुख्यालय थाटल्यानंतर ही ४६ पदे प्रत्यक्ष वर्ग केली जाणार आहे.

औरंगाबादकडे दहा पोलीस ठाणे
राज्यात लोहमार्ग पोलिसांचे सहा उपअधीक्षक कार्यालय व २२ पोलीस ठाणे आहेत. त्यापैकी शेगाव, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नंदूरबार, नाशिक रोड, इगतपुरी, औरंगाबाद, नांदेड, परळी वैजनाथ हे दहा पोलीस ठाणे औरंगाबाद घटकाकडे वर्ग केले गेले आहे. त्यातील सात मनमाड उपविभागात तर तीन जालना उपविभागात समाविष्ठ करण्यात आले.

अकोला उपविभागाकडे तीन ठाणे
नागपूर उपविभागात सहा पोलीस ठाणे होते. त्यापैकी अकोला, वर्धा व बडनेरा हे तीन पोलीस ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या नवनिर्मित अकोला उपविभागाकडे वर्ग केले गेले आहे. पुणे घटकातील सहा पोलीस ठाणे हे पुणे व सोलापूर उपविभागांतर्गत राहणार आहे. आतापर्यंत लोहमार्ग पोलिसात नागपूर हे १६ पोलीस ठाण्यांसह सर्वात मोठे घटक होते. परंतु आता त्यांच्याकडे केवळ सहा ठाणे ठेवण्यात आली असून दहा पोलीस ठाणे औरंगाबादला वर्ग केली गेली.

एसपी कार्यालय आयुक्तालयात
औरंगाबाद घटकाकरिता स्वतंत्र मुख्यालय, मेस, रुग्णालय अद्याप अस्तित्वात आलेले नाही. ‘पोलीस अधीक्षक लोहमार्ग औरंगाबाद’ हे कार्यालयसुद्धा तेथील पोलीस आयुक्तालयाच्या आवारात थाटण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यालयाचे मनुष्यबळ तूर्त वर्ग केले जाणार नाही.

स्वतंत्र प्रस्ताव मागितला
पोलीस अधीक्षक लोहमार्ग औरंगाबाद यांच्या कार्यालयाकरिता लागणारे मनुष्यबळ, साधन सामुग्री व इतर आवश्यक बाबींबाबत रीतसर आढावा घेऊन तसा परिपूर्ण अहवाल सादर करावा, असे निर्देश अपर पोलीस महासंचालक (लोहमार्ग) जयजितसिंह यांनी १ सप्टेंबर २०१८ रोजी जारी केले.

Web Title: Division of the Nagpur Railway police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.