राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या देशमुख चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:32 PM2018-07-26T12:32:54+5:302018-07-26T12:34:12+5:30

प्रतिभावंत बुद्धिबळपटू महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने नेत्रदीपक कामगिरीच्या बळावर कोलकाता येथे १५ वर्षे गटाच्या मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकविले.

Divya Deshmukh Champion in National Chess Championship | राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या देशमुख चॅम्पियन

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या देशमुख चॅम्पियन

googlenewsNext
ठळक मुद्दे१५ वर्षे खुल्या गटात द्वितीय मानांकित नागपूरच्या संकल्प गुप्ताने रौप्यपदक जिंकले. संकल्पला अंतिम फेरीत विजय नोंदविण्यात अपयश आले. संकल्पसह अन्य पाच खेळाडूंची गुणसंख्या प्रत्येकी साडेआठ झाल्यामुळे तांत्रिक गुणांच्या आधारे संकल्प कांस्यचा मानकरी ठरला.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिभावंत बुद्धिबळपटू महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने नेत्रदीपक कामगिरीच्या बळावर कोलकाता येथे १५ वर्षे गटाच्या मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकविले. दिव्याने याआधी दिल्ली येथील राष्टÑकुल बुद्धिबळ स्पर्धेतही विजेतेपद पटकविले होते.
बंगाल चेस असोसिएशनतर्फे आयोजित या स्पर्धेत अग्रमानांकित दिव्याने दहाव्या फेरीअखेर सर्वाधिक नऊ गुणांची कमाई केली होती. अकराव्या फेरीत दिव्याला तामिळनाडूची १५ वी मानांकित एम.के. पूर्णाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पूर्णाची गुणसंख्या ८.५ झाली. दिव्याने अनिंदा संतोष (महाराष्ट्र), अनुष्का गुप्ता (पश्चिम बंगाल) व दिव्यभारती मसनाम (तामिळनाडू), प्रियंका राऊतरे (ओडिशा), मृदुल डेहनकर (नागपूर), भाग्यश्री पाटील (महाराष्ट्र), सलोनिका सैना (ओडिशा), ब्रिश्ती मुखर्जी (प. बंगाल) यांना पराभूत केले. भूम्मिनी कौनिका (आंध्र प्रदेश), एल. जोत्सना (तामिळनाडू) या खेळाडूंविरुद्ध मात्र तिची गुणविभागणी झाली.
 

Web Title: Divya Deshmukh Champion in National Chess Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.