‘महिला इंटरनॅशनल मास्टर’चा दिव्याला पहिला नॉर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:27 AM2018-01-09T10:27:19+5:302018-01-09T10:28:13+5:30
आंतरराष्टय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिला ‘महिला इंटरनॅशनल मास्टर’चा पहिला नॉर्म मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्टय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिला ‘महिला इंटरनॅशनल मास्टर’चा पहिला नॉर्म मिळाला आहे. २९ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर स्पर्धेत दिव्याने डब्ल्यूआयएम नॉर्म प्राप्त केला. तीन नॉर्म मिळविणारी बुद्धिबळपटू ‘महिला इंटरनॅशनल मास्टर’बनते. याच स्पर्धेत तिला उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेत ८९ वी मानांकित असलेल्या दिव्याने ३७ वे स्थान पटकविले. या स्पर्धेत ३१५ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अखेरच्या फेरीआधीच दिव्याने हा बहुमान मिळविला हे विशेष. दिव्याने यशाचे श्रेय कोच ग्रॅण्डमास्टर आर. बी. रमेश तसेच बीव्हीएमच्या प्राचार्य अंजू भुटानी यांना दिले.