दिवाळी फराळ २०१८; वैदर्भीय स्पेशल पिठीची करंजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 09:51 AM2018-10-31T09:51:44+5:302018-10-31T09:53:52+5:30

दिवाळीच्या फराळात सर्वात आवडता पदार्थ कोणता.. असा प्रश्न विचारल्यास दहाजणांपैकी आठजणांचे उत्तर, करंजी, असे असते.

Diwali Aparal 2018; Crackle | दिवाळी फराळ २०१८; वैदर्भीय स्पेशल पिठीची करंजी

दिवाळी फराळ २०१८; वैदर्भीय स्पेशल पिठीची करंजी

Next
ठळक मुद्देदीर्घकाळ टिकणारी व कमी खर्चाची

अस्मिता कोठीवान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दिवाळीच्या फराळात सर्वात आवडता पदार्थ कोणता.. असा प्रश्न विचारल्यास दहाजणांपैकी आठजणांचे उत्तर, करंजी, असे असते. दिसायला दिमाखदार, खाण्यास लाघवी असलेला हा पदार्थ दिवाळीतील पदार्थांच्या रांगेत वरच्या क्रमांकावर नेहमीच विराजमान असतो.
विविध प्रदेशात भिन्न प्रकारच्या करंज्या बनविल्या जातात. त्यात ओल्या खोबऱ्यापासून ते खव्यापर्यंतचे सारण भरले जाते. विदर्भात पिठीची करंजी हा एक पारंपारिक प्रकार केला जातो. इतर करंज्यांच्या तुलनेत ही करंजी बरेच दिवस टिकते. कारण तीत कुठलाच ओला पदार्थ वा ओलसर पदार्थ वापरला जात नाही. आता पाहूया पिठीच्या करंजीची पाककृती.
साहित्य- रात्री गहू ओलसर करून ठेवावेत. सकाळी ते दळून घ्यावेत. दळलेले पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे.
यासोबत पिठीसाखर, वेलदोडा पूड, चारोळी, रवा, तेल.
कृती- गव्हाची पिठी साजूक तुपात खमंग भाजावी. तीत समप्रमाणात पिठीसाखर घालून वेलदोडा पूड व चारोळी घालावीत. रव्यात चवीला मीठ टाकून मोहन घालावे व घट्ट भिजवावे. ही कणिक अर्धा तास झाकून ठेवावी. नंतर रव्याचे लहान आकाराचे गोळे करून पातळसर लाटून तीत गव्हाचे सारण भरावे. मुरड घालून तेल वा तुपात मंद आचेवर करंज्या तळाव्यात. या करंज्या बरेच दिवस टिकतात. त्याला कुठलाच खवट वास येत नाही.

Web Title: Diwali Aparal 2018; Crackle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी