ऑनलाईनसंगे साजरा होतोय दिवाळसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 07:07 PM2021-11-06T19:07:00+5:302021-11-06T19:07:32+5:30

वसुबारस ते भाऊबीज अशा काळात ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही जागी दिवाळी लखलखत आहे.

Diwali is being celebrated online | ऑनलाईनसंगे साजरा होतोय दिवाळसण

ऑनलाईनसंगे साजरा होतोय दिवाळसण

Next



नागपूर: दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित नव्हे कोरोडोगुणित करणाऱ्या सोशल मिडियासंगे यंदाचा दिवाळी उत्सव जोरात साजरा होताना दिसतो आहे. वसुबारस ते भाऊबीज अशा काळात ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही जागी दिवाळी लखलखत आहे.
परदेशी राहणाऱ्या मुला-सुना-नातवंडांना ऑनलाईन आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या व स्वीकारल्या जात आहेत. दिवाळी फराळाचे जिन्नस ऑनलाईन दिले व स्वीकारले जात आहेत.
अशा दिवाळीला काव्यमय शब्दात मांडायचे तर, ते असे सांगता येईल..

दिवाळी..आनंदाची!
दिवाळी आहे...
सर्व काही व्यवस्थित फेसबुक
इन्स्टाग्रामवर वाट्सअप स्टेटसवर
रंगून गेलेच पाहिजे !
हा ड्रेस ही रांगोळी
हा आकाशदिवा ही रोशणाई
कमीत कमी १०० लाईक
खूप सारी कमेन्ट झालेच पाहिजे !

नाही तर कुठली दिवाळी
कुठे हे आनंद कुठे ही मजा
सर्व जेव्हा चमकत आहे
तेव्हा मला दिसलेच पाहिजे !
आणि हे पोस्ट हे स्टेटस
हे सर्व हॅन्डलवर पोस्ट झाले
आणि लगेच ...
कोणी केव्हा वा काय केले ?
सतत मोबाईलवर बघितले पाहिजे !

काय..कुणी पोस्ट बघितले नाही
कुणी लाईक केले नाही,
मन उदास झाले ..खिन्न वाटतंय
मनाची ही दशा ओळखली पाहिजे !
प्रश्न पडला का ?
खरं तर पडायला पाहिजे !
दिवाळी दाखवायची की
साजरी करायची.. हा प्रश्न आहे
दाखवायच्या शर्यतीमध्ये
साजरी करणे तर विसरत नाही
हा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे !

खमंग फराळ, सुगंधी उटणे
दिव्यांच्या ओळी फटाक्यांचा धूर
विसरुन जावे सर्व ग्लानी थकवा
या उजेडात मग्न झाले पाहिजे !
आई बरोबर रांगोळी
बाईकोला फराळासाठी मदतीचा हात
बैठक मित्रांची भेटी शेजारच्यांना
या सणानी सर्वांना जोडले पाहिजे !

सेल्फीच्या या युगामध्ये
ग्रुप फोटो मागे राहून गेले
आनंदी होण्यापेक्षा दाखविण्यात
आपण जास्त रमतोय हे कळले पाहिजे !
दिव्याने दिवा उजळतो
आनंदाने आनंद पसरतो
आनंद दाखविण्यात रमण्यापेक्षा
आनंदामध्ये लिप्त होऊन गेले पाहिजे !

डॉ. दिलीपकुमार राणा

Web Title: Diwali is being celebrated online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.