स्वरवेधच्या स्वरयात्रेने गंधाळली दिवाळी पहाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 09:17 PM2018-11-09T21:17:23+5:302018-11-09T21:21:19+5:30

दिवाळीच्या उत्साही अशा वातावरणात ठिकठिकाणी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमांनी रसिक श्रोत्यांसाठी स्वरानंदाची साखरपेरणी केली आहे. या विविध आयोजनात स्वरवेधने आपल्या नावीन्यपूर्ण दिवाळी पहाटचे आयोजन करून श्रोत्यांना चार कार्यक्रमांची सांगितिक मेजवानी प्रदान केली. ज्येष्ठ गायक कलावंतांची ‘उत्साहयात्रा’, स्वरवाद्यांचा अविष्कार असलेली ‘स्वरयात्रा’ आणि तालवाद्यांचा झंकार असलेली ‘तालयात्रा’ सादर करून श्रोत्यांना स्वरांचा आनंदठेवा दिला.

Diwali dawn grips with swaroop vowels | स्वरवेधच्या स्वरयात्रेने गंधाळली दिवाळी पहाट 

स्वरवेधच्या स्वरयात्रेने गंधाळली दिवाळी पहाट 

Next
ठळक मुद्देस्वर आणि तालवाद्यांची आनंदयात्रा : चार कार्यक्रमांची सांगितिक मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : दिवाळीच्या उत्साही अशा वातावरणात ठिकठिकाणी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमांनी रसिक श्रोत्यांसाठी स्वरानंदाची साखरपेरणी केली आहे. या विविध आयोजनात स्वरवेधने आपल्या नावीन्यपूर्ण दिवाळी पहाटचे आयोजन करून श्रोत्यांना चार कार्यक्रमांची सांगितिक मेजवानी प्रदान केली. ज्येष्ठ गायक कलावंतांची ‘उत्साहयात्रा’, स्वरवाद्यांचा अविष्कार असलेली ‘स्वरयात्रा’ आणि तालवाद्यांचा झंकार असलेली ‘तालयात्रा’ सादर करून श्रोत्यांना स्वरांचा आनंदठेवा दिला.


ज्येष्ठ गायकांचा सहभाग असलेल्या उत्साहयात्रेच्या अपूर्व यशानंतर स्वरवेधतर्फे स्वरयात्रेच्या निमित्ताने सुरांच्या दवबिंदूची पखरण करीत स्वरवाद्यांच्या सहभागाने दिवाळी पहाट गंधाळली. हे आयोजन सायंटिफीक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना अ‍ॅड. भानुदास कुळकर्णी यांची होती. यावेळी गायक कलावंतांच्या साथीला सतार, संतूर, सारंगी, संवादिनी, व्हायोलिन, बासरी अशा स्वरवाद्यांनी रसिकांच्या कानात प्रसन्न अनुभूतीचे स्वर निनादले. या वाद्यांचा लीलया उपयोग करून माधुर्य लाभलेल्या गीतांचे सादरीकरण यावेळी गायक कलावंतांनी केले. स्वरवेधच्या अनेक वर्षाच्या प्रवासात सहभागी असलेले वादक कलावंत यात सहभागी होते. यामध्ये सतारीवर शुभदा देशपांडे, संतूरवर वाल्मिक धांडे, व्हायोलिनवर अमर शेंडे, अरविंद उपाध्ये यांची बासरी, ऋग्वेद यांची मेडोलीन तर संवादिनीवर नरेंद्र कडवे यांनी स्वरलहरींची जादू श्रोत्यांवर बिखेरली. यासोबत अमर कुळकर्णी, रसिका बावडेकर, अवंतिका पाध्ये, श्रुती जैन, मनीषा अंदूलकर, शीला कु ळकर्णी, वैशाली उपाध्ये या गायक कलावंतांनी या स्वरयात्रेला सुरांनी सजवित रसिकांना अवर्णनीय आनंद दिला. या गायकांना वादकांची मिळालेली वाद्यसंगत ही पहाट अधिक रंगतदार ठरली. निवेदन रेणुका देशकर व मुकूंद देशपांडे यांचे होते. श्रोत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद कार्यक्रमाला लाभला.

Web Title: Diwali dawn grips with swaroop vowels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.