मेडिकलला ११०० कोटी रुपयांची दिवाळी भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 08:00 AM2022-10-21T08:00:00+5:302022-10-21T08:00:07+5:30

Nagpur News मध्य भारतातील रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेल्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘अपग्रेडेशन’साठी १,१०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

Diwali gift of Rs 1100 crore to medical college | मेडिकलला ११०० कोटी रुपयांची दिवाळी भेट!

मेडिकलला ११०० कोटी रुपयांची दिवाळी भेट!

googlenewsNext
ठळक मुद्देसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकामही होणार पूर्णअद्ययावत ‘बर्न वॉर्ड’सह ‘लंग इन्स्टिट्यूट’

सुमेध वाघमारे

नागपूर : मध्य भारतातील रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेल्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘अपग्रेडेशन’साठी १,१०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दिल्याने मेडिकलच्या रुग्णांसह येथील डॉक्टर व विद्यार्थ्यांसाठी दिवाळीची ही आगळीवेगळी भेट ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नुकतीच मेडिकलला भेट दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी विकासकामांचा प्रस्ताव सादर केला. यात ‘बाह्यरुग्ण विभाग’ (ओपीडी) व अपघात विभाग, ‘एएनसी ओपीडी’, ३० खाटांचे ‘एनआयसीयू’, ट्रॉमा केअर सेंटर, मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह, नवीन बर्न वॉर्ड, ‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’, लग्न इन्स्टिट्यूट, कॅन्सर हॉस्पिटल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याचा यात समावेश आहे.

- कॉलेजचाही विकास

मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चर हॉल, म्युझियम, प्रॅक्टिकल हॉलचे अपग्रेडेशन आणि नवीन कौशल्य प्रयोगशाळा, क्लिनिकल कॉम्प्युटर लॅबचा विकासही केला जाणार आहे. याशिवाय, ४०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मुला-मुलींसाठी नवे वसतिगृह, ‘पीजी’ वसतिगृह, नवीन मिनी स्टेडियम, जलतरण तलावाचे अपग्रेडेशन, इनडोअर स्टेडियमचे अपग्रेडेशनही प्रस्तावित आहे. याशिवाय, डॉक्टर-कर्मचाऱ्यांची हॉटेल, मेस आणि कॅन्टीन सुविधा, लॉण्ड्री, पाणी व ऊर्जा व्यवस्थापन, एसटीपी आणि ईटीपी प्लांट, ड्रेनेज व्यवस्थापन आणि सौर यंत्रणा प्रस्तावित आहे.

- ७५व्या वर्षानिमित्त कन्व्हेन्शन सेंटर

मेडिकलला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने ‘अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्ताने नवे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ उभारले जाणार आहे. याशिवाय, रुग्णालय परिसरातील रस्ते, अतिथीगृह, सभागृह आणि कॅम्पसचे सुशोभिकरण प्रस्तावित आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मेडिकलच्या ‘अपग्रेडेशन’साठी १,१०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मेडिकलला भेट देऊन विकासकामांवर चर्चा केली.

- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल

Web Title: Diwali gift of Rs 1100 crore to medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.