दिवाळीच्या रात्री प्रदूषणाचा स्तर उच्चांकावर! रामनगर, महालात निर्देशांक १२०० ते १५०० वर; २४ तासात सरासरी ३९९ एक्युआय

By निशांत वानखेडे | Published: November 13, 2023 06:25 PM2023-11-13T18:25:11+5:302023-11-13T18:25:48+5:30

उत्सवाचा उत्साह शिगेला पाेहचला की कायद्याचे बंधन खुजे ठरते आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणाही हतबल हाेतात.

Diwali night pollution level at the highest Ramnagar, Mahalat index from 1200 to 1500 Average 399 acu in 24 hours | दिवाळीच्या रात्री प्रदूषणाचा स्तर उच्चांकावर! रामनगर, महालात निर्देशांक १२०० ते १५०० वर; २४ तासात सरासरी ३९९ एक्युआय

दिवाळीच्या रात्री प्रदूषणाचा स्तर उच्चांकावर! रामनगर, महालात निर्देशांक १२०० ते १५०० वर; २४ तासात सरासरी ३९९ एक्युआय

नागपूर : उत्सवाचा उत्साह शिगेला पाेहचला की कायद्याचे बंधन खुजे ठरते आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणाही हतबल हाेतात. फटाक्यांच्या आतषबाजीवर लावलेल्या प्रतिबंधाचेही तेच झाले. प्रतिबंध असूनही लाेकांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केली. त्याचे परिणामही दिसून येत आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागपूरच्याप्रदूषणाचा निर्देशांक सरासरी ३९९ एक्युआयच्या उच्चांकावर पाेहचला. हा यावर्षीचा उच्चांक आहे. दिल्ली, मुंबईप्रमाणे नागपूरचे वातावरणही प्रदूषित हाेत आहे. हिवाळ्याच्या काळात त्यात अधिक वाढ हाेते आणि दिवाळीमध्ये ते धाेक्याच्या पातळीच्या वर जाते. वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) ० ते ५० वर असेल तर श्वास घेण्यास चांगला असताे. ताे ५१ ते १०० पर्यंत गेला तरी समाधानकारक असताे. एक्युआय १०० च्यावर गेल्यास ज्येष्ठ नागरिक, आजारी व दमा रुग्णास श्वास घेण्याचा त्रास वाढताे आणि २०० च्यावर गेल्यास प्रदूषित व ३०० च्यावर गेल्यास अत्याधिक वाईट मानला जाताे.

नागपुरात नाेव्हेंबर सुरू झाल्यापासून निर्देशांक १५० ते २०० च्या स्तरावर आहे. दिवाळी सुरू झाल्यापासून २००, २५० ते ३०० एक्युआयच्या जवळपास पाेहचला आहे. रविवारी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या रात्री लाेकांनी जाेरात फटाके फाेडले आणि एक्युआय ३९९ च्या अति धाेकादायक स्तरावर पाेहचला. त्याहून धक्कादायक म्हणजे रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास शहराच्या मध्यभागी महाल परिसरात स्तर १२५६ ते १५३५ एक्युआय माेजण्यात आला. रामनगर भागात ५६६ ते ११०९ एक्युआयची नाेंद करण्यात आली. अंबाझरी परिसरात ३०२ ते ६४५ एक्युआय आणि सिव्हील लाईन्स भागात ३०० एक्युआयची नाेंद करण्यात आली.

फटाक्यांतून निघतात हे प्रदूषित वायू
फटाके तयार करताना काॅपर, झिंक, लेड, साेडियम, मॅग्नेशियम, कॅडिमयम यांसारख्या घातक धातूंचा वापर केला जाताे. फटाके फाेडल्यानंतर सल्फर डायऑक्साईड, नायट्राेजन डायऑक्साईड, कार्बन माेनाेक्साईड या वायूंचे तसेच निकेल, कॅडिमयम, क्राेमियम या जड धातूंचे उत्सर्जन हाेते, जे प्रदषणू वाढण्यास कारणीभूत ठरते. शिवाय धुलिकणांचा धाेकादायक स्तर वाढताे.

महाराष्ट्रातील हवा अत्यंत खराब
यावर्षी सुद्धा महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता फटाक्यांमुळे अत्यंत खराब झाली. लक्ष्मी पूजनाच्या रात्री केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दर ताशी घेण्यात येणाऱ्या रात्री ९ वा. घेतलेल्या निरीक्षनानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक एक्युआय ठाणे येथे ३६३०, अकोला-२०७०, थेरगाव, पुणे येथे-१७४१, महाल,नागपूर -१२५६, जळगाव-१०८५, अहमदनगर-१९५१ आढळला.

इतर शहरात निर्देशांक
चंद्रपुर-४५५, अमरावती-६८४, परभणी-६९८, जालना-४४२, लातुर-५३४, कोल्हापूर-६१८, सांगली-४६५, नाशिक-७२८, धुळे-४८६, औरंगाबाद-३८८, सोलापूर-३१२

Web Title: Diwali night pollution level at the highest Ramnagar, Mahalat index from 1200 to 1500 Average 399 acu in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.