दिवाळी खरेदीची गर्दी अन् वाहतूक कोंडी; सीताबर्डीत वाहनांना ‘नो एन्ट्री’, इतवारीत अनेक रस्त्यांवर ‘वन वे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 05:15 PM2022-10-20T17:15:28+5:302022-10-20T17:27:16+5:30

दिवाळीतील वाहतूक कोंडीवर उपाय

Diwali shopping causing traffic snarls in Nagpur; 'No entry' for vehicles in Sitabuldi, 'One way' on many roads in Itwari | दिवाळी खरेदीची गर्दी अन् वाहतूक कोंडी; सीताबर्डीत वाहनांना ‘नो एन्ट्री’, इतवारीत अनेक रस्त्यांवर ‘वन वे’

दिवाळी खरेदीची गर्दी अन् वाहतूक कोंडी; सीताबर्डीत वाहनांना ‘नो एन्ट्री’, इतवारीत अनेक रस्त्यांवर ‘वन वे’

Next

नागपूर : दिवाळीच्या तोंडावर शहरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होत असून, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सीताबर्डी बाजारात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय इतवारीतील अनेक मार्गांवर ‘वन वे’ राहणार आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत हे नियम पाळावे लागणार आहेत.

दिवाळीच्या खरेदीसाठी सितबार्डी, इतवारी, महाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. बेशिस्त वाहतूक व पार्किंगमुळे कोंडी होत आहे. त्यामुळे ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीताबर्डी बाजारात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे.

येथे वाहनांना ‘नो एन्ट्री’

  • हनुमान गल्ली ते व्हेरायटी चौक
  • सीताबर्डी मुख्य मार्ग
  • मोदी क्रमांक एक, दोन व तीन

हे असतील ‘वन-वे’

  • शहीद चौक ते मस्कासाथ चौक
  • तीननल चौक ते शहीद चौक
  • नंगा पुतळा चौक ते टांगास्टॅंड
  • सेंट्रल एव्हेन्यू ते गांधीबाग

अशी वळविली आहे इतवारीतील वाहतूक

  • शहीद चाैकमधून किराणा ओळीमार्गे मस्कासाथ चौकाकडे जाणारे सायकल रिक्षा, दुचाकी, वाहने शहीद चौकातून डावे वळण घेऊन तीननल चौकातून भारतमाता चौकाच्या मार्गाने जातील किंवा शहीद चौकातून उजवे वळण घेऊन जुना मोटर स्टॅन्ड चौक या मार्गाने जातील.
  • तीननल चौकामधून जुना भंडारा रोडमार्गे शहीद चौकाकडे जाणारे सायकल रिक्षा, दुचाकी, वाहने तीननल चौकातून डावे वळण घेऊन नंगा पुतळा चौक या मार्गाने जातील.

मालवाहतूक रात्री करावी लागणार

निर्देशांनुसार इतवारीतील दुकानात मालवाहतूक करणाऱ्या थ्री व्हिलर व फोर व्हिलर वाहनांतून रात्री ११ ते सकाळी ८ या वेळेत मालाची ने-आण करावी लागेल. तसेच इतवारी शहीद चौक, मस्कासाथ, किराणा ओळी, सोना-चांदी दुकानदार तसेच इतर दुकानदार यांनी फोर व्हिलरचा वापर न करता दुचाकी वाहनांचा वापर करावा अशी सूचना करण्यात आली आहे.

Web Title: Diwali shopping causing traffic snarls in Nagpur; 'No entry' for vehicles in Sitabuldi, 'One way' on many roads in Itwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.