दिवाळीत रेल्वेगाड्यात वाढली गर्दी : वेटिंगच्या तिकिटामुळे प्रवासी झाले हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 08:15 PM2019-10-23T20:15:55+5:302019-10-23T20:16:44+5:30
दिवाळीच्या काळातील सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. बहुतांश रेल्वेगाड्यातील तिकिटे दलालांनी बुक केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीला दोन दिवस उरले आहेत. दिवाळीच्या सणाला अनेकजण रेल्वेने प्रवासाचे प्लॅनिंग करतात. परंतु दिवाळीच्या काळातील सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. चार महिन्यांपूर्वी आरक्षणाची सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिल्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्यातील तिकिटे दलालांनी बुक केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याची मागणी होत आहे.
दिवाळीच्या काळातील २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीतील विविध शहरात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या स्थितीचा आढावा घेतला असता जवळपास सर्वच रेल्वेगाड्यातील आरक्षण संपल्याची बाब उजेडात आली. १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये स्लिपर ५५ ते १०४ वेटिंग, थर्ड एसी १३३ वेटिंग, १२८६० गीतांजली एक्स्प्रेस स्लिपर ८८, थर्ड एसी ३८ वेटिंग, १२८१० हावडा-मुंबई मेल स्लिपर २४ ते ५५ वेटिंग, १२१४० सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये १०६ वेटिंग, १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस ७५ वेटिंग आहे. पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यात १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस ३२ ते १४७ वेटिंग, १२८४९ बिलासपूर-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस १३४ वेटिंग, १२१३० बिलासपूर-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस ११८ ते १३७ वेटिंग, १२११४ नागपूर-पुणे गरिबरथ ७२ ते २०९ वेटिंग, १२२२२ हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस थर्ड एसी आरएसी ३५ ते ९७ वेटिंग आहे. उत्तरेकडील गाड्यात १२६२५ केरळ एक्स्प्रेस स्लिपर १५० वेटिंग, थर्ड एसी ३४ वेटिंग, १२६२१ तामिळनाडू एक्स्प्रेस स्लिपर ८८ वेटिंग, थर्ड एसी ४० वेटिंग, १२७२३ तेलंगाणा एक्स्प्रेस स्लिपर ३७६ वेटिंग, थर्ड एसी ६६ वेटिंग आहे. १२४०९ गोंडवाना एक्स्प्रेस स्लिपर २५ वेटिंग, थर्ड एसी ३३ वेटिंग, १८२३७ हजरत निजामुद्दीन छत्तीसगड एक्स्प्रेस स्लिपर २५ वेटिंग, थर्ड एसी १३ वेटिंग आहे. चेन्नईकडील गाड्यात १२६१६ जीटी एक्स्प्रेस २५ ऑक्टोबरला स्लिपर क्लासमध्ये रिग्रेट असून ५ नोव्हेंबरपर्यंत ४३ वेटिंग, थर्ड एसी ११२ वेटिंग, १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेस स्लिपर क्लास २४ ते ५५ वेटिंग, थर्ड एसी २५ वेटिंग, १२५११ राप्तीसागर एक्स्प्रेस स्लिपर क्लास २९ वेटिंग, थर्ड एसी १६ वेटिंग, १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेस स्लिपर क्लास ३४ ते १४६ वेटिंग, थर्ड एसी ५४ वेटिंग, १२६५२ संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये वेटिंग ३७ वर पोहोचले आहे.
हावडा मार्गावरील १२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये स्लिपर क्लास ४४ ते १५६ वेटिंग, थर्ड एसी ६१ वेटिंग, १२९०६ हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस स्लिपर क्लास ३३ ते ४७ वेटिंग, थर्ड एसी १९ वेटिंग, १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये स्लिपरक्लास ५३ ते १४२ वेटिंग, थर्ड एसी ४८ वेटिंग आहे. रेल्वेगाड्यातील या स्थितीमुळे दिवाळीत प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना वेटिंगचे तिकीट मिळत आहे. प्रवाशांना अधिक पैसे मोजून खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागणार असल्यामुळे त्यांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे.
अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याची गरज
‘सणासुदीला रेल्वेगाड्यात वेटिंग राहणार नाही, असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले होते. परंतु त्यात शासनाला यश आले नाही. दिवाळीच्या काळात सर्वच रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याची गरज आहे.’
प्रवीण डबली, माजी झेडआरयुसीसी सदस्य, मध्य रेल्वे.