दिवाना हुआ सैतान....भाचीशी बोलण्यास मनाई करणाऱ्या मामासोबतच स्वत:च्या सख्या भावावरदेखील वार

By योगेश पांडे | Published: January 5, 2024 04:13 PM2024-01-05T16:13:46+5:302024-01-05T16:13:54+5:30

योगेश पांडे नागपूर : भाचीशी बोलण्यास मनाई करणाऱ्या मामासोबतच एका तरुणाने स्वत:च्या सख्या भावावरदेखील वार करत दोघांनाही जखमी केले. ...

Diwana hua satan.... along with the uncle who forbade him to talk to his niece, he also stabbed his own brother | दिवाना हुआ सैतान....भाचीशी बोलण्यास मनाई करणाऱ्या मामासोबतच स्वत:च्या सख्या भावावरदेखील वार

दिवाना हुआ सैतान....भाचीशी बोलण्यास मनाई करणाऱ्या मामासोबतच स्वत:च्या सख्या भावावरदेखील वार

योगेश पांडे

नागपूर : भाचीशी बोलण्यास मनाई करणाऱ्या मामासोबतच एका तरुणाने स्वत:च्या सख्या भावावरदेखील वार करत दोघांनाही जखमी केले. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शुभम उर्फ मोंटू अशोक शाहू (२९, सक्करदरा) असे आरोपीचे नाव आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीशी त्याची मैत्री होती.

मात्र त्याची संगत चांगली नसल्याने तिच्या मामाने त्याच्याशी बोलणे बंद करण्यास सांगितले. तसेच त्यालादेखील तिच्याशी काहीच संपर्क न ठेवण्याबाबत बजावले. मात्र मोंटू यासाठी तयार नव्हता. त्याने गुरुवारी दोन वाजता तिच्या मामाला भांडे प्लॉट भागात भेटायला बोलविले. मामाची प्रकृती ठीक नसल्याने तो मित्रासोबत तेथे पोहोचला. मोंटूने त्याचे बोलणे ऐकण्यास नकार दिला व शिवीगाळ सुरू केली. त्याने वाद घालत अचानक खिशातून चाकू काढला व मामाच्या खांद्यावर वार केला.

मोंटूचा मोठा भाऊ शुभांशू अशोक शाहू (३१) याने हा प्रकार पाहिला व तो मध्यस्थी करायला धावला. मात्र संतापाने पेटलेल्या मोंटूने स्वत:च्या भावाच्या पोटावरच चाकूने वार करत त्याला जखमी केले. या प्रकारानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. तातडीने दोघांनाही इस्पितळात नेण्यात आले. मुलीच्या मामाच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात मोंटूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Diwana hua satan.... along with the uncle who forbade him to talk to his niece, he also stabbed his own brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.