डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश अर्ज ३ जूनपासून
By आनंद डेकाटे | Published: May 31, 2024 05:29 PM2024-05-31T17:29:00+5:302024-05-31T17:29:45+5:30
Nagpur : ३ जूनपासून संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरवात होईल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरणेबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
३ जूनपासून www.maa.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरवात होईल. अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा ईमेल-आयडी असणे बंधनकारक आहे. प्रवेश अर्ज शुल्क- खुला संवर्ग २०० रूपये, खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग १०० असे राहील., उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र शुल्क भरावे लागेल.प्रवेश अर्ज शुल्क स्वीकारण्याची पद्धती प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन/payment gateway/Ewallet स्वतःचे किंवा नातेवाईकांच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारेच स्वीकारले जाईल.
प्रवेश पात्रता प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज, विज्ञान व एम.सी.व्ही.सी. शाखेतील पात्र उमेदवार इ. १२ वी खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. उमेदवारांना प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी स्वतःच्या registered ई-मेलवरून support@deledadmission.in या ई-मेलवर पाठवाव्यात. प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.