‘डीएमआयएमएस’चा देशातील टॉप १०० संस्थांत समावेश ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:09 AM2021-09-19T04:09:07+5:302021-09-19T04:09:07+5:30
नागपूर : नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)मध्ये दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (डीएमआयएमएस) डीम्ड युनिव्हर्सिटी सावंगी मेघेने देशातील ...
नागपूर : नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)मध्ये दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (डीएमआयएमएस) डीम्ड युनिव्हर्सिटी सावंगी मेघेने देशातील टॉप १०० संस्थांमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. नुकतीच देशभरातील उच्च शिक्षण संस्थांची रँकिंग जारी करण्यात आली. यात देशभरातील विद्यापीठांच्या श्रेणीत ‘डीएमआयएमएस’ला ६१ वी रँक, मेडिकल स्कूल्सच्या श्रेणीत ३४ वी रँक आणि डेंटल स्कूल्सच्या श्रेणीत १९ वी रँक प्राप्त झाली आहे.
‘डीएमआयएमएस’ डीम्ड युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. राजीव बोर्ले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २०१५ मध्ये एनआयआरएफची घोषणा केली होती. तेव्हापासूनच ‘डीएमआयएमएस’च्या रँकिंगमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. राज्यात टॉप १०० मध्ये येणाऱ्या संस्थांमध्ये राज्यातील केवळ दोन संस्थांचा समावेश आहे. यापैकी ‘डीएमआयएमएस’ एक संस्था आहे. ते म्हणाले, संस्थेची ही उपलब्धी टीम वर्कचा परिणाम आहे. कोरोना संक्रमणादरम्यान ‘डीएमआयएमएस’ने उल्लेखनीय योगदान दिले आहे. या कालावधीत कोविड-१९ वर संस्थेचे १३८ रिसर्च पेपर जगातील प्रतिष्ठित जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. खासगी विद्यापीठांच्या श्रेणीत एवढे रिसर्च पेपर प्रकाशित करणारे ‘डीएमआयएमएस’ हे राज्यातील दुसरे विद्यापीठ आहे. ‘डीएमआयएमएस’चे प्र-कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आगामी काळात इंजिनिअरिंग आणि ह्युमॅनिटीजशिवाय कॉमर्स व मॅनेजमेंटशी संबंधित इतर विषय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेला ‘डीएमआयएमएस’चे चान्सलर दत्ता मेघे यांची प्रमुख उपस्थिती होती. (वा. प्र.)
.............