ओळख पटविण्यासाठी आता डीएनए चाचणी; साेलर स्फाेट प्रकरण : मृतदेहांचे तुकडे विखुरले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 08:19 AM2023-12-19T08:19:27+5:302023-12-19T08:19:33+5:30
पाेलिसांनी घटनास्थळाहून चार मृतदेह, दाेन धड आणि शरीराच्या अवयवांचे १८ विविध भाग ताब्यात घेतले आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चाकडोह (ता. नागपूर ग्रामीण) शिवारातील साेलर इंडस्ट्रीजमध्ये रविवारी झालेल्या स्फाेटात नऊ कामगारांचा जीव गेला. येथील मृतदेहांची ओळख पटविणे कठीण असल्याने डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
पाेलिसांनी घटनास्थळाहून चार मृतदेह, दाेन धड आणि शरीराच्या अवयवांचे १८ विविध भाग ताब्यात घेतले आहेत. मृतदेह ओळख पटण्याच्या स्थितीत नसल्याची माहिती पाेलिस अधीक्षक हर्ष पाेद्दार यांनी सोमवारी दिली. नागपूर (ग्रामीण) पाेलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यात त्यांना ६० ते ८० टक्के शाबूत असलेले चार मृतदेह, दाेन धड व शरीराचे १८ वेगवेगळे भाग आढळले. ते सर्व शवविच्छेदन व तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. साेमवारी सकाळपासून शवविच्छेदन सुरू करण्यात आले.
स्फाेटाच्या कारणांचा शाेध सुरू
‘क्रिमिनल लायबिलिटी’ आणि ‘सेफ्टी प्राेटाेकाॅल’ विचारात घेता या प्रकरणात सध्या भादंवि ३०४ (सदाेष मनुष्यवध) ऐवजी भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची नागपूर ग्रामीण पाेलिस व पेट्राेलियम एक्स्पाेझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन स्वतंत्रपणे चाैकशी करत आहे. पाेलिसांच्या रिपाेर्ट आधारे जिल्हाधिकारी या प्रकरणाची स्वतंत्र चाैकशी करू शकतात.
१०० मीटर परिघात काेम्बिंग
nपाेलिसांच्या दाेन टीमनी साेमवारी घटनास्थळाच्या १०० मीटर परिघात काेम्बिंग सुरू केले आहे. यात पाेलिस मृतदेहांचे काही अवयव अथवा शरीराचे भाग मिळतात का? याची चाचपणी करत आहेत.
nहाडांचे नमुने घेण्यासाठी तेथील ढिगाऱ्याचे खाेदकाम सुरू केले आहे, असेही पाेलिस अधीक्षक हर्ष पाेद्दार यांनी सांगितले.