मेट्रो थीमवर करा मंडपाची आकर्षक सजावट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:50 PM2018-09-07T23:50:42+5:302018-09-07T23:52:03+5:30

शहरात गणेश उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून भक्त तयारीला लागले आहे. गणेश उत्सवासाठी नागरिकांची आपुलकी पाहून महामेट्रो नागपूरने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महामेट्रोने गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत मेट्रोच्या थीमवर डिझाईन तयार करून उत्कृष्ट सजावट करणाऱ्या मंडळांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

Do attractive décor on the metro theme | मेट्रो थीमवर करा मंडपाची आकर्षक सजावट 

मेट्रो थीमवर करा मंडपाची आकर्षक सजावट 

Next
ठळक मुद्देमहामेट्रोतर्फे गणेश उत्सव स्पर्धा : चमू मंडपाला भेट देणार


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात गणेश उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून भक्त तयारीला लागले आहे. गणेश उत्सवासाठी नागरिकांची आपुलकी पाहून महामेट्रो नागपूरने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महामेट्रोने गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत मेट्रोच्या थीमवर डिझाईन तयार करून उत्कृष्ट सजावट करणाऱ्या मंडळांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांनी व कौटुंबिक सदस्यांनी महामेट्रोच्या ई-मेलवर सजावट केलेले फोटो पाठविता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भक्तांना आपल्या सार्वजनिक मंडळाची सजावट मेट्रोच्या थीमवर करणे आवश्यक आहे. मेट्रो प्रकल्पांतर्गत विविध कार्याची प्रतिकृती मंडळांना देता येईल.
एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन खापरी मेट्रो स्टेशन याशिवाय महामेट्रो कोचची थीम मंडळांना सादर करता येणार आहे. तर मेट्रो थीमशी संबंधित रेखाचित्रदेखील मंडळे आपल्या मंडपात लावून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. महामेट्रोच्या ई-मेलवर पाठविण्यात आलेल्या छायाचित्रांची निवड करण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या मंडळांना महामेट्रोची चमू प्रत्यक्ष भेट देऊन मंडप सजावटीचे निरीक्षण करेल.
गेल्यावर्षी राबविण्यात आलेल्या महामेट्रोच्या गणेश उत्सव स्पर्धेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तब्बल १ हजारावर सार्वजनिक मंडळाने स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. घरी गणेश मूर्ती बसवून आकर्षक सजावट करणारे भक्तदेखील स्पर्धेत सहभागी झाले होते. यावर्षी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा महामेट्रोला विश्वास आहे.

Web Title: Do attractive décor on the metro theme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.