प्राधान्यक्रमाने विकासकामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:25 AM2021-01-08T04:25:48+5:302021-01-08T04:25:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : केंद्र सरकारच्या धाेरणात्मक निर्णयामुळे विकासकामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट निधी उपलब्ध करून दिला जात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : केंद्र सरकारच्या धाेरणात्मक निर्णयामुळे विकासकामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट निधी उपलब्ध करून दिला जात आहे. या निधीचा याेग्य वापर व्हावा, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी केले.
तालुक्यातील ग्रामपंचायत येथे आयाेजित कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. ‘आमचा गाव-आमचा विकास’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून ग्रामपंचायतीला प्राप्त हाेणाऱ्या निधीपैकी किमान २५ टक्के निधी हा शिक्षण, आराेग्य व उपयाेगिता यावर खर्च करणे अनिवार्य आहे. कढाेली ग्रामपंचायतीने गावात उत्कृष्ट कार्य करून गावाचा विकास घडविला आहे. गावात स्मशानभूमी साैंदर्यीकरण, मननिस्सारण व्यवस्था, ग्रामस्वच्छता, वाचनालय, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था, आदी लाेकाेपयाेगी कामे करून सरपंच प्रांजल वाघ यांनी सरपंचपद सार्थकी ठरविले आहे.
या ग्रामपंचायतीला पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कार मिळाला असून, तालुका स्मार्ट ग्राम निवडीत कढाेली गावाने नाव नाेंदविल्याने तालुक्याचा नावलाैकिक वाढल्याचे गटविकास अधिकारी गराटे यांनी सांगितले. याप्रसंगी यशस्वी सरपंच म्हणून सरपंच प्रांजल वाघ व ग्रामसचिव ब्रह्मानंद खडसे यांचा पंचायत समितीच्या वतीने सभापती उमेश रडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पं. स. सदस्य दिलीप वंजारी, सहायक गटविकास अधिकारी प्रदीप गायगाेले, विस्तार अधिकारी शशिकांत डाखाेळे, अरविंद अंतुरकर, आदींची उपस्थिती हाेती.