शिक्षण मंत्री खोटे बोलतात का ?
By admin | Published: April 25, 2017 01:36 AM2017-04-25T01:36:17+5:302017-04-25T01:36:17+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत विविध आक्षेप घेण्यात येत आहेत.
५० टक्क्यांहून अधिकची मान्यताच नाही : उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा दावा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत विविध आक्षेप घेण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या निर्देशांचा हवाला देत प्रशासनाने २३ जागांसाठी जाहिरात काढली. मात्र एकूण पदांच्या ५० टक्के भरतीचा नियम शिक्षण क्षेत्रासाठी लागू नाही, असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला होता. मात्र उच्च व तंत्रशिक्षण विभागानेच तावडे यांच्या दाव्याला सुरुंग लावला आहे. ५० टक्क्यांहून अधिक पदभरतीची मान्यताच नसल्याचे विभागाच्या सहसचिवांनी पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मात्र राज्याच्या तिजोरीवरील भार लक्षात घेता, वित्त विभागाने काही विभागांना अगोदर ७५ टक्के पदभरतीची सूट दिली होती. मात्र नंतर सुधारणा करून ही मर्यादा ५० टक्क्यांवर आणली होती. २ जून व १६ जुलै २०१५ रोजीच्या शासन निर्णयात तसे स्पष्टपणे नमूददेखील करण्यात आले. शिक्षकेतर प्रवर्गात सरळसेवेतील रिक्त पदाच्या ५० टक्के किंवा एकूण मंजूर पदांच्या ४ टक्के यापैकी जे कमी असतील ते भरा, असे शासन निर्देशात नमूद होते. त्यानुसार नागपूर विद्यापीठाने २३ महत्त्वाच्या शिक्षकेतर पदांसाठी जाहिरात काढली. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना केवळ २३ पदांसाठीच जाहिरात निघाल्याच्या संदर्भात विनोद तावडे यांना विचारणा केली असता, पदभरतीची मर्यादा शिक्षण विभागासाठी नाही, असा दावा त्यांनी केला होता. सोबतच तीन महिन्यांत १०० टक्के पदे भरण्यात येतील, असेदेखील त्यांनी म्हटले होते.
मात्र २१ एप्रिल २०१७ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांच्या नावाने पत्र जारी केले. शासन निर्णयानुसार रिक्त असलेल्या पदांपैकी ५० टक्के किंवा एकूण संवर्गाच्या ४ टक्के यापैकी जे कमी असेल इतकीच पदे भरण्यास मुभा आहे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रामुळे तावडे यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी हे पत्र प्राप्त झाल्याचे सांगितले. शासन निर्णयानुसारच विद्यापीठाने जाहिरात काढल्याचा त्यांना पुनरुच्चार केला. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)