करा याेग, रहा निराेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:47+5:302021-06-22T04:06:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जागतिक योग दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी योग, प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले. धकाधकीच्या युगात निरोगी ...

Do it, stay calm | करा याेग, रहा निराेग

करा याेग, रहा निराेग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जागतिक योग दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी योग, प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले. धकाधकीच्या युगात निरोगी आरोग्यासाठी ‘योग’ हा एकमात्र उपाय असल्याचा संदेश या कार्यक्रमात देण्यात आला. सामूहिक योगासन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. योग ही हजारो वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यत्मिक साधना असून, शरीर व मनात परिवर्तन घडवून आणण्यास मदत होत असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

....

पतंजली याेग समिती कळमेश्वर

कळमेश्वर : पतंजली याेग समिती व भाजपच्या वतीने नगर परिषद खुले नाट्यगृह येथे योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पाेतदार यांनी केले. वसंत केशरवानी, सुभाष पाटणकर, संजय पाेतदार यांच्या मार्गदर्शनात याेगासने करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष स्मृती ईखार, भाजपचे शहराध्यक्ष धनराज देवके, नगरसेवक महादेव ईखार उपस्थित होते. कार्यक्रमात ४५ याेग अभ्यासकांनी सहभाग घेतला. प्रकाश वरुळकर यांनी आभार मानले......

सेवानंद विद्यालय काेराडी

काेराडी : भाजपच्या वतीने महादुला येथील सेवानंद विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. शारीरिक अंतर व काेराेनाच्या नियमांचे पालन करीत योगाभ्यास करण्यात आला. यावेळी महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारी, किशोर बरडे, सरपंच नरेंद्र धानोले, प्रीतम लोहासारवा, सभापती पंकज ढोणे, महेश धुळस, नगरसेवक विजय राऊत, नंदा तुरक, अभिजित ढेगरे, ममता वरठे यांच्यासह अंकित तुरक, नरेंद्र झोड, अरुण उजवणे, महेंद्र कांबळे, राजू ढेंगे, हर्षा शर्मा अजित गेडाम, नितीन मनवर, आकाश रॉय, राहुल इंगोले आदी उपस्थित होते.

....

एनटीपीसी माैदा

रेवराल : एनटीपीसी प्रकल्प माैदा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त योग सत्राचे आयाेजन करण्यात आले. एनटीपीसीचे समूह महाव्यवस्थापक हरिप्रसाद जोशी यांनी योग हा व्यायामाचा एक प्रभावी प्रकार आहे. याद्वारे शरीरातील केवळ अंगातच नव्हे तर मनाने, मेंदूमध्ये आणि आत्म्यातही संतुलन निर्माण होते. योगाद्वारे शारीरिक आजारांव्यतिरिक्त मानसिक त्रासांवरही विजय मिळवता येत असल्याचे सांगितले. याेग सत्राचे नेतृत्व नीता परिहार यांनी केले. यानिमित्त निबंध लेखन, पोस्टर आणि सर्वोत्कृष्ट योग आसन स्पर्धेचे आयाेजन करून योगाचे महत्त्वाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Web Title: Do it, stay calm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.