गर्दीमुळे भ्रमात राहू नका

By admin | Published: July 4, 2016 02:34 AM2016-07-04T02:34:46+5:302016-07-04T02:34:46+5:30

सत्तेमुळे कामानिमित्ताने लोकांची गर्दी वाढते. ही लोकाभिमुखता नव्हे. या गर्दीमुळे महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कौल आपल्याच बाजूने लागेल,

Do not be confused with the crowd | गर्दीमुळे भ्रमात राहू नका

गर्दीमुळे भ्रमात राहू नका

Next

मुख्यमंत्र्यांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान : जनतेशी संवाद साधा
नागपूर : सत्तेमुळे कामानिमित्ताने लोकांची गर्दी वाढते. ही लोकाभिमुखता नव्हे. या गर्दीमुळे महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कौल आपल्याच बाजूने लागेल, अशा भ्रमात राहू नका. जनसंवाद कार्यक्रम हाती घेऊ न नगरसेवक, आमदार व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कामाला लागावे, असे खडेबोल सुनावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. रजवाडा पॅलेस येथे आयोजित भाजपच्या नागपूर महानगर कार्यसमितीच्या बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
राज्याच्या विकासासोबतच पक्ष संघटना सक्रिय आहे. परंतु सत्तेत असताना जनतेसोबतचा संपर्क तुटतो. लोकप्रतिनिधी व जनता यांच्यातील संवादात अडथळा निर्माण होतो. हा अडथळा बाजूला सारून ‘मॅन टू मॅन’ व ‘हार्ट टू हार्ट’ संबंध जुळला पाहिजे. लोकांची गर्दी वाढली म्हणजे काम वाढले, असा अर्थ होत नाही. ही गर्दी मतपेटीत रूपांतरित होण्यासाठी जनसंपर्क वाढवा. या जोरावर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उपराजधानीचा कायापालाट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अद्वितीय काम केले आहे. यामुळे पुढील तीन ते चार वर्षांत देशाचे चित्र बदलेल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून देशभरात रस्ते व बंदराचे जाळे उभारले जात आहे. रस्ता हा समृद्धीचा मार्ग असायचा, परंतु २१ वे शतक डिजिटल नेटवर्क राहणार आहे. ही बाब विचारात घेता जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी २ आॅक्टोबरला नागपूर जिल्हा डिजिटल केला जाणार आहे. पुुढील तीन वर्षांत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायती डिजिटल नेटवर्कसोबत जोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

१०० कोटींचा निधी
नागपूर शहरातील अनधिकृत ले-आऊ टमधील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या भागाच्या विकासासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून १०० कोटींचा निधी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील प्रत्येक घरापर्यत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकून शहर टँकरमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे
नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप व्हावे यासाठी राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. याचा शहरातील ३ ते ४ लाख लोकांना मोठा दिलासा मिळेल. त्यांना जागा व घराचे हक्क मिळणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

२०२०पर्यत बेघरांना घरे
गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य सरकारने नागपूर शहराच्या विकासाला गती दिली आहे. प्रथमच नागपूर शहर केंद्र व राज्य सरकारच्या विकास अजेंड्यावर आले आहे. शहरात रस्ते व पुलाचे जाळे निर्माण होत आहे. मेट्रो रेल्वेचे काम गतीने होत आहे. मिहान, एम्स, आयआयएम, यासारख्या संस्था उभ्या राहात आहेत. नागपूरला शैक्षणिक हब करण्याचा संकल्प आहे. यातून मोठ्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. २०२० सालापर्यंत नागपूर शहरातील बेघर लोकांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध केली जातील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
दीड ते दोन वर्षात सर्व सेवा मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध होतील. यासाठी डिजिटल महाराष्ट्र करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिकांतही हा पॅटर्न राबविला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,खासदार अजय संचेती, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, अनिल सोले, गिरीश व्यास, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, नागो गाणार, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, पक्षाचे संघटनमंत्री रामदास आंबटकर, रवी भुसारी, संजय बंगाले, माजी महापौर अर्चना डेहनकर, कल्पना पांडे, जयप्रकाश गुप्ता यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकारिणीच्या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Do not be confused with the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.