संघटित होऊ न संघाची ‘नीती’ हाणून पाडा

By admin | Published: January 12, 2015 01:05 AM2015-01-12T01:05:18+5:302015-01-12T01:05:18+5:30

२०१४ च्या निवडणुकीपर्यंत हिंदू राष्ट्राची भाषा होत नव्हती, आता ती होत आहे. परंतु असे झाले तर देशावर भयंकर संकट येईल. ते कोणत्याही परिस्थितीत रोखले पाहिजे.

Do not be united to defeat the 'policy' of the team | संघटित होऊ न संघाची ‘नीती’ हाणून पाडा

संघटित होऊ न संघाची ‘नीती’ हाणून पाडा

Next

मंथन-चर्चा : दलित हत्याकांडावर आरएसएस ‘मौन’ का?
नागपूर : २०१४ च्या निवडणुकीपर्यंत हिंदू राष्ट्राची भाषा होत नव्हती, आता ती होत आहे. परंतु असे झाले तर देशावर भयंकर संकट येईल. ते कोणत्याही परिस्थितीत रोखले पाहिजे. यासाठी अभ्यास करून व संघटित होऊ न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नीती दलित समाजाने हाणून पाडावी, असे आवाहन प्रा. भाऊ लोखंडे यांनी रविवारी केले. हिंदी मोरभवन येथे आयोजित देशातील दलित हत्याकांडावर आरएसएस मौन का? या मंथन-चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. रणजित मेश्राम अध्यक्षस्थानी होते.
देशातील बहुसंख्यक लोकांचा धाक अल्पसंख्यक लोकांच्या मनात नसावा. परंतु आज देशातील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू सुरक्षित तर देश सुरक्षित असा प्रचार चालविला आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता येताच हिंदुत्वाची भाषा सुरू झाली आहे. देशाची एकात्मता व अखंडतेसाठी हा धोक्याच्या इशारा असल्याचे त्यांनी सांतिगले.
सत्तेवर येताच भाजप व संघाने हिंदू राष्ट्राची भाषा सुरू केली आहे. यापासून देशाला धोका आहे. याचा विरोध करण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे. क ोणताही चमत्कार रात्रीतून घडत नसतो. चळवळ ही मांजराच्या पावलाने चालत असते. भविष्याचा विचार करताना इतिहासही विसरता येणार नाही,असे रणजित मेश्राम म्हणाले. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर नंतरच्या ६६ वर्षांच्या काळात संघाच्या लोकांनी अपमान सहन केला. सत्ता परिवर्तनासाठी त्यांना इतकी वर्षे प्रतीक्षा करावी लागली. देशाची फाळणी झाली तेव्हा लाखो लोकांचे बळी गेले होते. परंतु त्याही वेळी देशातील अल्पसंख्यक लोकांना असुरक्षित वाटत नव्हते. कारण सत्ता संघाच्या हातात नव्हती. देशातील सत्ता परिवर्तनासाठी दलित समाजालाही प्रतीक्षा करावी लागेल, असेही ते म्हणाले. यावेळी प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. संदीप नंदेश्वर, दिनेश अंडरसहारे व अशोक सरस्वती आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विनायक जामगडे यांनी तर संचालन निरंजन वासनिक यांनी केले.(प्रतिनिधी)
कार्यक्र मात चप्पल भिरकावली
प्रा. प्रवीण कांबळे व अशोक सरस्वती यांनी आपल्या भाषणातून एकमेकांवर टीका केली. यातून प्रकरण हमरीतुमरीवर आले. रागाच्या भरात कांबळे उभे झाल्याने भाषण देत असलेले सरस्वती यांनी त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. यामुळे काही वेळ कार्यक्रमात गोंधळ उडाला होता.

Web Title: Do not be united to defeat the 'policy' of the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.