ईदला नमाज व इफ्तारसाठी एकत्र येऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:03 AM2020-05-24T00:03:42+5:302020-05-24T00:06:37+5:30

रमजान महिन्यामध्ये तसेच रमजान ईद (ईद-उल-फित्र ) यानिमित्ताने मुस्लिम बांधव अधिक संख्येने एकत्र आल्यास कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिकरीत्या मशीदमध्ये समाज बांधवांनी एकत्रित येऊन नमाज अदा न करणे मुस्लिम बांधवांच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे आहे. याचा विचार करता कोविड- १९ च्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Do not come together for Eid prayers and Iftar | ईदला नमाज व इफ्तारसाठी एकत्र येऊ नका

ईदला नमाज व इफ्तारसाठी एकत्र येऊ नका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: रमजान महिन्यामध्ये तसेच रमजान ईद (ईद-उल-फित्र ) यानिमित्ताने मुस्लिम बांधव अधिक संख्येने एकत्र आल्यास कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिकरीत्या मशीदमध्ये समाज बांधवांनी एकत्रित येऊन नमाज अदा न करणे मुस्लिम बांधवांच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे आहे. याचा विचार करता कोविड- १९ च्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
यासंदर्भात आयुक्तांनी काही सूचना केल्या आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत सामाजिक विलगीकरणाचे पालन केले जात आहे. पवित्र रमजान महिन्यामध्ये तसेच रमजान ईदचे दिवशी देखील कटाक्षाने पालन करण्यात यावे.
कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नियमित नमाज पठण, तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये.
घराच्या वा इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येऊ नये.
कोणताही धार्मिक सामाजिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन साजरा मज्जाव करण्यात आला आहे.
सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी तारीख धार्मिक कार्य कोविड-१९ संदर्भात दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मास्कचा वापर करून व सामाजिक अंतर ठेवून पार पडावे.
लॉकडाऊन संदर्भात पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सूचनांचे काटेकोर पालन करावे.
यासंदर्भात निर्देश तुकाराम मुंढे यांनी यांनी पोलीस विभागाला दिले आहेत.

Web Title: Do not come together for Eid prayers and Iftar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.