हेल्मेटची सक्ती नको, लूट थांबवा
By admin | Published: February 9, 2016 03:08 AM2016-02-09T03:08:13+5:302016-02-09T03:08:13+5:30
हेल्मेटसक्तीच्या नावावर हेल्मेट विक्रेते आणि पोलीस लूट करीत आहेत. मध्यमवर्गीयांची मोठी गळचेपी होत आहे.
निवृत्त एसीपी साखरकर
नागपूर : हेल्मेटसक्तीच्या नावावर हेल्मेट विक्रेते आणि पोलीस लूट करीत आहेत. मध्यमवर्गीयांची मोठी गळचेपी होत आहे. हेल्मेटची सक्ती केली जाऊ नये, प्रबोधनाच्या माध्यमातून कायदा राबविला जावा, असे मत सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त जी. एम. साखरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
हेल्मेटसक्तीचा गैरफायदा विक्रेते घेत आहेत. दोन हजार ते अडीच हजार रुपयात हेल्मेट विकत आहेत. वास्तविक हेल्मेटची निर्मिती किंमत दीडशे ते दोनशे रुपये आहे. हेल्मेट न घातल्याने कारवाई होऊन मोठा भुर्दंडही त्यांना सहन करावा लागत आहे. मध्यमवर्गीयच मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे हेल्मेटसक्तीचा दुहेरी मार या मध्यमवर्गीयांवर पडत आहे. सत्यपालसिंग हे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी हेल्मेट निर्मिती कंपन्यांशी बोलणी करून अत्यंत स्वस्त किमतीमध्ये हेल्मेट उपलब्ध करून दिले होते, असेही साखरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)