डोन्ट वरी ‘आयवॉच पोलीस’ आहे ना

By admin | Published: February 25, 2015 02:42 AM2015-02-25T02:42:48+5:302015-02-25T02:42:48+5:30

संकटाच्या काळात प्रत्येकाची धांदल उडते. मोबाईलमध्ये मित्र व आप्तस्वकीयांची डिरेक्टरी असली तरी, नेमक ी कुणाला हाक मारावी हेच कळत नाही.

Do not matter is 'Iwatch Police' | डोन्ट वरी ‘आयवॉच पोलीस’ आहे ना

डोन्ट वरी ‘आयवॉच पोलीस’ आहे ना

Next

नागपूर : संकटाच्या काळात प्रत्येकाची धांदल उडते. मोबाईलमध्ये मित्र व आप्तस्वकीयांची डिरेक्टरी असली तरी, नेमक ी कुणाला हाक मारावी हेच कळत नाही. मोबाईलच्या मर्यादेनुसार एकाच वेळी फक्त एकालाच कॉल जाऊ शकतो. अशावेळी ज्याला फोन लावला तो फोनही उचलत नाही. त्यामुळे संकटात सापडलेला हतबल होतो आणि बळी पडतो. आता नागपूर पोलिसांनी संकटकाळी नागपूरकरांच्या मदतीसाठी संकटमोचक अ‍ॅप लाँच केले आहे. मंगळवारी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या हस्ते पोलीस नियंत्रण कक्षात अ‍ॅप चे उद्घाटन झाले.
इंडियन आय सिक्युरीटी नवी दिल्ली यांनी नागपूर पोलिसांसाठी ‘आयवॉच पोलीस’ अ‍ॅप ची निर्मिती केली आहे. हे अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये प्लेस्टोअरमधून विनामूल्य डाऊनलोड करता येईल. ‘आयवॉच पोलीस‘ हे सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येकासाठीचे अ‍ॅप आहे. महिला, पालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सर्वच याचा उपयोग घेऊ शकतात. संकटकालीन परिस्थीतीत या अ‍ॅपचा उपयोग होऊ शकतो. यामुळे तात्काळ पोलिसांना तुमच्या लोकेशनची माहिती मिळते.
अ‍ॅप डाऊनलोड करताना त्यात दिलेल्या आॅप्शननुसार आपला मोबाईल नंबर, नातेवाईक अथवा मित्रांचे किमान ८ मोबाईल नंबर अलर्ट पाठविण्यासाठी सेव्ह करता येतात. तसेच आपले रक्तगट व इतर माहिती सुध्दा त्यामध्ये सेव्ह करता येते. उद्घाटन कार्यक्रमाला सह पोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग, आतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे, श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा दीपाली मासिरकर, इंडियन आय सिक्यूरिटीचे हेमंत शिवदासानी, मिलिंद लगाडे यांच्यासह शहरातील दक्षता समितीचे सदस्य, नगरसेविका, महिला सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Do not matter is 'Iwatch Police'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.