भूमाफियांना पाठीशी घालू नका

By admin | Published: May 11, 2017 02:49 AM2017-05-11T02:49:16+5:302017-05-11T02:49:16+5:30

जमिनीच्या वादासंबंधीच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्या. कारवाईच्या संबंधाने अडचण होत असेल

Do not support landlords | भूमाफियांना पाठीशी घालू नका

भूमाफियांना पाठीशी घालू नका

Next

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका : पोलीस ठाण्यांना सूचनावजा इशारा
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जमिनीच्या वादासंबंधीच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्या. कारवाईच्या संबंधाने अडचण होत असेल तर संबंधित वरिष्ठ आणि तज्ज्ञांची मदत घ्या. मात्र, कारवाई करण्यास टाळाटाळ करून भूमाफियांना मदत होईल, अशी भूमिका घेऊ नका, असा खणखणीत सूचनावजा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शहरातील पोलिसांना देण्यात आला आहे. या भूमिकेमुळे भूमाफिया ग्वालबन्सीचे साम्राज्य उद्ध्वस्त करतानाच पोलिसांनी आता उपराजधानीतील अन्य भागातील भूमाफियांवरही नजर रोखल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भूमाफियांसोबतच त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांमध्येही खळबळ निर्माण झाली आहे.
स्वप्नातील घर निर्माण करण्यासाठी अनेकांचे आयुष्य खर्ची पडते. आयुष्यभर राबराब राबल्यानंतर त्यातील मिळकतीतून अनेकजण भूखंड विकत घेतात. भविष्यात आर्थिक जुळवाजुळव झाल्यानंतर त्यावर घर बांधू, असे स्वप्न रंगवून भूखंड मालक पुढच्या जुळवाजुळवीचे प्रयत्न करतात. मात्र, त्यावर ग्वालबन्सीसारखे भूमाफिया आपल्या गुंडांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून रातोरात कब्जा करतात. तेथे कुंपण टाकून आपला मालकी हक्क दाखवणारा फलकही लावतात. कधीतरी एखादवेळी भूखंडाकडे चक्कर टाकायला आलेल्या भूखंड मालकाला ते पाहून जबर मानसिक धक्का बसतो. तो आधी त्या फलकावर लिहिलेल्या नावाच्या व्यक्तीशी संपर्क करतो. त्याच्याकडून अपमान आणि मनस्ताप मिळाल्यानंतर संबंधित भागातील पोलीस ठाण्यात जातो. मात्र, पोलीस अशा प्रकरणापैकी ९० टक्के प्रकरणात पीडित व्यक्तीकडून अतिक्रमण करणाऱ्याचे नाव, पत्ता विचारल्यानंतर त्याच्याशी संपर्क करतात अन् नंतर तक्रार घेऊन येणाऱ्यांना टरकावून लावतात. त्याच्या हाती एनसी (अदखलपात्र) पावती देऊन ‘हे प्रकरण आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. तुम्ही कोर्टात जा’ असा सल्ला देऊन पीडित व्यक्तीची बोळवण करतात. काही प्रकरणात कब्जा करणाऱ्याला (भूमाफियाला) बोलवून ‘समेट’ करण्याच्या नावाखाली पीडित व्यक्तीची मानसिक आणि आर्थिक कोंडी करण्याचेही प्रयत्न होतात.
अशी हजारो प्रकरणे शहरात झाली असून, या प्रकरणातून ग्वालबन्सीसारखे अनेक भूमाफिया शहरात तयार झाले आहेत. या भूमाफियांमुळे अनेक जण अक्षरश: उद्ध्वस्त झाले असून, अनेकांनी जीवही दिले आहेत. ग्वालबन्सी प्रकरणातून त्याची प्रचितीही आली आहे.

Web Title: Do not support landlords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.