दडपण नको, नियमित अभ्यासाने मिळते यश
By admin | Published: May 26, 2016 02:54 AM2016-05-26T02:54:53+5:302016-05-26T02:54:53+5:30
परीक्षेच्या वेळी दडपण येणे साहजिक आहे; मात्र त्याचा परिणाम अभ्यासावर पडू दिला नाही. अभ्यासाच्या प्रत्येक वेळी आई-वडिलांचे सहकार्य मिळाल्याने
सेंट पॉलच्या क्षिप्राला ९६.४६ टक्के : डॉक्टर होण्याची व्यक्त केली इच्छा
नागपूर : परीक्षेच्या वेळी दडपण येणे साहजिक आहे; मात्र त्याचा परिणाम अभ्यासावर पडू दिला नाही. अभ्यासाच्या प्रत्येक वेळी आई-वडिलांचे सहकार्य मिळाल्याने तणाव कमी झाला आणि अभ्यास सहज होत गेला. त्यामुळेच यश मिळाल्याची भावना ९६.४६ टक्के गुण मिळविलेल्या हुडकेश्वर येथील सेंट पॉल शाळेच्या क्षिप्रा प्रदीप मुदलियार हिने व्यक्त केली.
क्षिप्राने ६२७ गुण मिळवीत शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या यशाचे श्रेय तिने आई-वडील आणि शाळेच्या शिक्षकांना दिले आहे. लोकमतशी बोलताना क्षिप्राने यशाचे गमक सांगितले.
शिकवणी होतीच, मात्र स्वत: अभ्यासपूर्ण सराव करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दररोज चार ते पाच तास नियमित अभ्यास करीत असल्याचे तिने सांगितले. परीक्षेच्या काळात हा सराव अधिक केल्याचे ती म्हणाली. जीवशास्त्र आणि संस्कृत विषयात तिने १०० पैकी १०० गुण मिळविले, हे विशेष. शिप्राला चित्रपट पाहणे, नॉव्हेल वाचण्याचा छंद आहे, शिवाय मोबाईलचा वापरही ती करते. मात्र या सगळ्यांचा अतिरेक नको, असे ती ठामपणे सांगते. क्षिप्राला डॉक्टर व्हायचे आहे. (प्रतिनिधी)