कोषागार कार्यालयाच्या नावाने दूरध्वनी संदेश घेऊ नका

By आनंद डेकाटे | Published: May 24, 2024 04:16 PM2024-05-24T16:16:24+5:302024-05-24T16:18:47+5:30

Nagpur : निवृत्तीवेतनधारकांना जिल्हा कोषागाराचे आवाहन

Do not take telephone messages in the name of the Treasury Office | कोषागार कार्यालयाच्या नावाने दूरध्वनी संदेश घेऊ नका

Do not take telephone messages in the name of the Treasury Office

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
निवृत्तीवेतनधारकांना कोषागारामार्फत निवृत्ती विषयक, लाभ प्रदान करताना प्रदानाबाबत किंवा वसुलीबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात नाही व ऑनलाईन व्यवहाराविषयी सूचित करण्यात येत नसून असे दूरध्वनी संदेश घेवू नये, असे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी सतीश गोसावी यांनी केले आहे.

जिल्हा कोषागाराच्या अधिनस्त सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना कोषागारामार्फत निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान, वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरुपात पत्रव्यवहार केला जातो, असे प्रसिद्धीपत्रात सांगण्यात आले आहे.

निवृत्तीवेतनधारकांना फोन करुन ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांस निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.

सर्व निवृत्तीवेतनधारकांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरुन प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही. कोणीही अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये. निवृत्तीवेतनधाकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील. अशा प्रकारचा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कोषागार कार्यालयास अवगत करावे तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Do not take telephone messages in the name of the Treasury Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर