सत्ताधाऱ्यांची विचारधारा न मानणारे देशद्रोही का?
By admin | Published: March 4, 2016 03:06 AM2016-03-04T03:06:41+5:302016-03-04T03:06:41+5:30
देशातील विद्यमान सरकार ज्या विचारधारेवर चालत आहे ती विचारधारा मानणारे देशवासीच फक्त राष्ट्रभक्त तर ही विचारधारा न मानणारे देशद्रोही आहे ...
हरिभाऊ केदार : स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची निदर्शने
नागपूर : देशातील विद्यमान सरकार ज्या विचारधारेवर चालत आहे ती विचारधारा मानणारे देशवासीच फक्त राष्ट्रभक्त तर ही विचारधारा न मानणारे देशद्रोही आहे का, असा सवाल नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु हरिभाऊ केदार यांनी गुरुवारी केला.
केंद्र सरकारची दडपशाही व जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया यांना राष्ट्रद्रोहाच्या कथित आरोपाखाली अटक केल्याच्या निषेधात नागपुरातील शहीद चौकात गुरुवारी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक व गांधी विचारांना समर्पित विचारवंतांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून तीन तास धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या मूक धरणे आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कन्हैया सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधी विचारधारेचा असल्यानेच त्यांच्या विरोधात कथित राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यााचा निषेध करण्यासाठी तीन दिवस मूक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आंदोलनात ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक व सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे, दत्तात्रय बर्गी, नारायणराव चांदूरकर, यादवराव देवगडे, हरिभाऊ केदार, मा.म. गडकरी, उमेश चौबे, माजीमंत्री हरिभाऊ नाईक, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री नितीन राऊ त, डॉ. चित्रा तूर, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. रतिनाथ मिश्रा, काँग्रेस सेवादलाचे केशवराव शेंडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे, रामगोविंद खोब्रागडे, विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, नीरज चौबे, राजू व्यास, युवक काँग्रेसचे शहर अधयक्ष बंटी शेळके, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, रत्नमाला फोफरे, ममता गेडाम, प्रभाकर खापरे, कमलेश समर्थ, धनश्याम पनपालिया, अनिल पांडे, दीपक वानखेडे, विशाल लारोकार, विनोद उलीपवार, माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर, आकाश तायवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)