दलित किंवा नवबौद्ध वापरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:25 AM2017-08-26T01:25:35+5:302017-08-26T01:27:00+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे आपण केवळ बौद्ध आहोत. तेव्हा आपण स्वत:ला दलित किंवा नवबौद्ध म्हणवून घेऊ नका.

Do not use Dalit or Navbuddha | दलित किंवा नवबौद्ध वापरू नका

दलित किंवा नवबौद्ध वापरू नका

Next
ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बौद्ध म्हणूनच ओळख प्रस्थापित करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे आपण केवळ बौद्ध आहोत. तेव्हा आपण स्वत:ला दलित किंवा नवबौद्ध म्हणवून घेऊ नका. बौद्ध म्हणणूनच स्वत:ची ओळख प्रस्थापित करा. तसेच सरकारने सुद्धा दलित-नवबौद्ध याचा वापर करू नये, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)चे कार्यकारी अध्यक्ष राजरत्न अशोक आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.
रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. राजरत्न आंबेडकर म्हणाले, जनगणनेनुसार देशात बौद्धांची लोकसंख्या ८४ लाख इतकी सांगितली जात आहे. ती चुकीची आहे. ही संख्या कितीतरी अधिक आहे. यासाठी आपण स्वत: बौद्धांची जनगणना करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात तफावत आढळून आल्यास न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल सुरू असून देशभरात शाळा कॉलेज उभारण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.
संस्था सर्व न्यायालयीन लढाईतून मुक्त
२१ जून २०१३ रोजी न्यायालयाने अशोक आंबेडकर यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालानंतर संस्थेवरील मीराताई आंबेडकर यांचा दावा फेटाळण्यात आला असून बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया ही सर्व न्यायालयीन लढाईतून मुक्त झाली आहे, असा दावाही राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी केला.
ज्योतीकर हे विहिंपचे कार्यकर्ते
संस्थेचे विश्वस्त पी.जी. ज्योतीकर हे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त असलेला व्यक्ती अगदी विरोधाभासी असलेल्या संस्थेत कसे काय काम करू शकतो. त्यांनी चंद्रबोधी पाटील यांच्या माध्यमातून बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाला भाजपा व विहिंपच्य दावनीला बांधण्याचे काम केले आहे. त्यामुळे ज्योतीकर यांना विश्वस्त पदावरून काढण्यासाठी न्यायालयीन कारवाई केली जात असल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकरांनी केले संस्थेच्या घटनेचे उल्लंघन
प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच पुण्यातील दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला भेट दिली. त्यांची ही भेट राजकीय नेता म्हणून योग्य असली तरी भारतीय बौद्ध महासभेच्या नियमाचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे त्यांना या उल्लंघनाबद्दल संस्थेचे सदस्य होता येणार नसल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Do not use Dalit or Navbuddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.