मानधन नको वेतन हवे ?

By admin | Published: September 21, 2016 03:11 AM2016-09-21T03:11:19+5:302016-09-21T03:11:19+5:30

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी मानधनाऐवजी वेतनाच्या मागणीसाठी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात धरणे आंदोलन केले.

Do not want salaries? | मानधन नको वेतन हवे ?

मानधन नको वेतन हवे ?

Next

अंगणवाडी सेविकांचे आंदोलन : सरकारचे लक्ष वेधले
नागपूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी मानधनाऐवजी वेतनाच्या मागणीसाठी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात धरणे आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र संघटनेच्यावतीने मुंबई येथे आंदोलन सुरू असून त्याच्या समर्थनात हे एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.
सातत्याने सुरू असलेल्या या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी धरणा आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षा जयश्रीताई काळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाल्या. कर्मचाऱ्यांनी तीव्र नारेबाजी करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आधीच्या सरकारसारखेच आताचे सरकार असंवेदनशीलपणे काम करीत असल्याची टीका जयश्रीताई काळे यांनी केली.
आजच्या महागाईच्या तुलनेत अंगणवाडी सेविकेला कमीत कमी १३ हजार व मदतनीसला ९ हजार रुपये मानधन देण्यासह एकात्मिक बालविकास सेवा योजनेला शासकीय विभागात रूपांतरीत करावे, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन तृतीय व चतुर्थ श्रेणीत महागाई भत्ता व इतर सवलती लागू कराव्यात, कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत न ठेवता नियमित स्वरूपात देण्यात यावे, २००५ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन योजनेचा लाभ देण्यात यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनाबाह्य काम देण्यात येऊ नये अशा विविध मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादरकेले. यात जयश्रीताई यांच्यासह चंद्रशेखर शुक्ला, रुपचंद गद्रे, निर्मला निखाडे आदी सदस्य सहभागी झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Do not want salaries?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.