काम करा नाही तर घरी बसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:03 AM2017-07-18T02:03:24+5:302017-07-18T02:03:24+5:30

थकीत मालमत्ता आणि पाणीकर असणाऱ्या ग्राहकांसाठी महापालिकेने अभय योजना आणली आहे.

Do not work or sit at home | काम करा नाही तर घरी बसा

काम करा नाही तर घरी बसा

Next

अभय योजनेत १०० टक्के करवसुलीचे लक्ष्य : आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थकीत मालमत्ता आणि पाणीकर असणाऱ्या ग्राहकांसाठी महापालिकेने अभय योजना आणली आहे. ती केवळ ग्राहकांसाठीच नाही तर यात महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची परीक्षा होणार आहे. केवळ आठ तास कामाची मानसिकता सोडा, कर वसुलीसाठी २४ तास काम करा. या योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांक न करण्यात येईल. काम करा नाही तर घरी बसा अशी भूमिका महापालिका प्रशासनाची राहणार आहे, असा इशारा अश्विन मुद्गल यांनी सोमवारी महापालिकेच्या मंगळवारी झोन येथे आयोजित बैठकीत दिला.
थकबाकीदारांसाठी १७ जुलै ते ७ आॅगस्टदरम्यान अभय योजना राबविली जात आहे. मागील पाच दिवसांपासून स्थायी समिती सभापती संदीप जाधव, अश्विन मुद्गल आणि जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे हे झोननिहाय बैठका घेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून १०० टक्के करवसुली करण्यासाठी प्रयत्न करीत आहते. सोमवारी आसीनगर आणि मंगळवारी झोन येथे बैठक घेण्यात आली.
योजनेचा कालावधी मोठा आहे. जे करदाते एकाच दिवशी पूर्ण रक्कम भरू शकत नसेल तर दररोज टप्प्याटप्प्यात रक्कम भरता येईल. या सवलतीचा लाभ घेऊन आपली पाटी कोरी करा, असे आवाहन संदीप जाधव यांनी केले. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणाऱ्या सायबर टेक कंपनीबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावले. यापुढे तक्रारी आल्या तर कंत्राटाबाबत पुनर्विचार करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी झोन सभापती सुषमा चौधरी, भाग्यश्री कानतोडे, नगरसेविक संगीता गिऱ्हे, अर्चना पाठक, रश्मी धुर्वे, संजय बुरेवार, नरेंद्र वालदे, सुनील अग्रवाल, राजेश घोडपागे, नेहा निकोसे, भावना लोणारे, दिनेश यादव, मनोज सांगोळे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, सहायक अधीक्षक महेंद्र जनबंधू आदी उपस्थित होते.

Web Title: Do not work or sit at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.