आपण जिंकलो नसलो तरी पराभूत नाही.. लतादीदींचा एम.एस.ला सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 02:06 PM2019-07-11T14:06:39+5:302019-07-11T14:26:42+5:30

वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर जी गरमागरम चर्चा आहे ती, महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीची. त्याने निवृत्ती घ्यावी की घेऊ नये याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये विभिन्न मते व्यक्त केली जात आहेत.

Do not you retire Dhoni ... Lata Mangeshkar's tweet | आपण जिंकलो नसलो तरी पराभूत नाही.. लतादीदींचा एम.एस.ला सल्ला

आपण जिंकलो नसलो तरी पराभूत नाही.. लतादीदींचा एम.एस.ला सल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर जी गरमागरम चर्चा आहे ती, महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीची. त्याने निवृत्ती घ्यावी की घेऊ नये याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये विभिन्न मते व्यक्त केली जात आहेत. या चर्चेत आपले मत नोंदविले आहे, ज्येष्ठतम गायिका लता मंगेशकर यांनी. त्यांनी ट्विटरवर नोंदविलेल्या पोस्टमध्ये, नमस्कार धोनीजी, अलीकडे मी ऐकते आहे, की तुम्ही निवृत्त होत आहात. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे आणि ही माझीही विनंती आहे की, निवृत्तीचा विचारही मनात येऊ देऊ नका.. असे म्हटले आहे. 

त्यांनी दुसºया ट्विटमध्ये, आपण जरी जिंकलेलो नसू तरीदेखील आपण पराभूत झालेलो नाही असे म्हटले आहे. सुप्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी लिहिलेले एक गीत त्यांनी क्रिकेट टीमला अर्पण केले आहे. 



 



 

Web Title: Do not you retire Dhoni ... Lata Mangeshkar's tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.