वृक्षाराेपणासह जाेपासनाही करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:10 AM2021-08-19T04:10:33+5:302021-08-19T04:10:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गुमगाव : मानवी जीवनात वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवाच्या मूलभूत गरजा पुरविणारे निसर्गाचे नि:शुल्क देणे म्हणजे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गुमगाव : मानवी जीवनात वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवाच्या मूलभूत गरजा पुरविणारे निसर्गाचे नि:शुल्क देणे म्हणजे वृक्ष आहेत. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने केवळ वृक्षाराेपण न करता वृक्षलागवड करून त्याचे संरक्षण आणि जाेपासना करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख यांनी केले.
शेतकऱ्यांना पिकांविषयी मार्गदर्शन तसेच गावकऱ्यांना भरीव सहकार्य करणाऱ्या अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या वतीने खडकी येथे ‘पर्यावरणासाठी वृक्षाराेपण’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत खडकी येथील प्रत्येक कुटुंबाला राेपटे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अर्चना धुर्वे, उपसरपंच माधुरी निकुळे, रवींद्र काटवे पाटील, माजी जि.प. सदस्य अशाेक साेमनकर, प्रीतम काेरे, व्यवस्थापक पीयूष तेलरांधे, गजानन लाड, माधुरी मंगाम, संजय मरसकाेल्हे, मिलिंद बुधबावरे, सुनंदा नरताम आदी उपस्थित हाेते.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमात महिला, भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नाेंदविला. कार्यक्रमाचे संचालन मधुसूदन चरपे यांनी केले तर सचिव गोपाल जाधव यांनी आभार मानले. आयाेजनासाठी प्रदीप डवरकर, संदीप उरकुडे, मारोती कावळे, किशोर शेळके, वृषभ कोहळे, नीता काटवे, कोकिळा कुनघटकर, सुनीता मरसकोल्हे, संदीप शेळके, संगीता सोमनकर, माधुरी मेहर, करुणा बारहाते, प्रकाश कुळमते, अंबादास सलाम आदींनी सहकार्य दिले.