काम शांतपणे करा, यशाचा आवाज हाेऊ द्या; माशेलकरांचे पदवीधर अभियंत्यांना पाच मंत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 09:57 PM2022-09-15T21:57:55+5:302022-09-15T21:58:35+5:30

Nagpur News तरुण अभियंत्यांवर याची माेठी जबाबदारी आहे. त्यामुळे काम शांतपणे करा पण तुमच्या यशाचा आवाज हाेऊ द्या, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक आणि सीएसआयआरचे माजी महासचिव डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी अभियंत्यांना केले.

Do the work in silence, let the sound of success be heard; Mashelkar's five mantras for graduate engineers | काम शांतपणे करा, यशाचा आवाज हाेऊ द्या; माशेलकरांचे पदवीधर अभियंत्यांना पाच मंत्र 

काम शांतपणे करा, यशाचा आवाज हाेऊ द्या; माशेलकरांचे पदवीधर अभियंत्यांना पाच मंत्र 

googlenewsNext
ठळक मुद्देव्हीएनआयटीचा २० वा दीक्षांत समाराेह

नागपूर : भारताला विकासाच्या ‘स्टार्टअप’ची गरज आहे. मात्र, हे स्टार्टअप सर्वसमावेशक असावे, जेथे कुणीही मागे राहणार नाही. तरुण अभियंत्यांवर याची माेठी जबाबदारी आहे. त्यामुळे काम शांतपणे करा पण तुमच्या यशाचा आवाज हाेऊ द्या, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक आणि सीएसआयआरचे माजी महासचिव डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी तरुण अभियंत्यांना केले.

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (व्हीएनआयटी)चा २० वा दीक्षांत समाराेह गुरुवारी संस्थेच्या सभागृहात पार पडला. यावेळी देशाचे लष्करप्रमुख जनरल मनाेज पांडे हे आभासी माध्यमाद्वारे उपस्थित हाेते. व्हीएनआयटीचे प्राचार्य प्रा. प्रमाेद पडाेळे व अन्य मान्यवरही उपस्थित हाेते. यावेळी डाॅ. माशेलकर यांनी पदवीधर अभियंत्यांना यशाचे पाच मंत्र दिले. जन्म आणि सुरूवात आपल्या हाती नाही. पण कुठे शेवट करायचे, हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपले भविष्य कुठे घेऊन जायचे, याचा विचार करून पावले उचलण्याची गरज आहे. दुसरे म्हणजे यशस्वी हाेण्यासाठी कठीण परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. तिसरे म्हणजे दृढ विश्वास असायला हवा. साेडून देणारे जिंकत नाहीत व जिंकणारे साेडून देत नाहीत. त्यामुळे काम शांतपणे करा व यशाचा आवाज हाेऊ द्या. चाैथे म्हणजे समाधानाचा भाग व्हा, समस्येचा नाही आणि पाचवे म्हणजे यशाची काेणतीही मर्यादा नसते. आपल्या देशासाठी तुम्ही कार्य करत राहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनाेज पांडे यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेसाठी तरुण अभियंत्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

अभिनव शिखरेला चार पदकांसह ८ पुरस्कार

समारंभादरम्यान व्हीएनआयटीच्या विविध विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांमध्ये सर्वाेत्तम सीजीपीए प्राप्त करून प्रथम क्रमांकावर आलेल्या अभिनव शिखरे या विद्यार्थ्याला ‘सर विश्वेश्वरय्या पदक’ प्रदान करण्यात आले. अभिनवने चार पदकांसह ८ पुरस्कार प्राप्त केले. बेसिक स्पष्ट आणि सातत्य असले की यश खेचून आणता येते, अशी भावना अभिनवने व्यक्त केली. सर्वाेच्च पदक प्राप्त करण्याचे ध्येय मनात बाळगले हाेते व त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास केल्याचे ताे म्हणाला. दाेन महिन्यांपूर्वी प्लेसमेंटमध्ये त्याला जाॅब मिळाला आहे. उद्याेगाचे काॅर्पाेरेट कल्चर अनुभवायचे आहे व स्वत:चा व्यवसाय उभा करायचा असल्याचे ध्येय त्याने व्यक्त केले.

समाराेहादरम्यान १३७५ पदवी प्रदान

समाराेहादरम्यान ७० डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी, ३७५ मास्टर ऑफ टेक्नाॅलाॅजी, ५६ मास्टर ऑफ सायन्स, ५५ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि विविध अभियांत्रिकी शाखांमधील ८१९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय व्हीएनआयटी विद्यार्थी व संशाेधन अभ्यासकांना ४७ पदके आणि गुणवंत शैक्षणिक कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Do the work in silence, let the sound of success be heard; Mashelkar's five mantras for graduate engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.