नागपुरातील सिमेंट मार्गाचे थर्ड पार्टी ऑडिट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:48 PM2019-05-18T23:48:24+5:302019-05-18T23:49:34+5:30
शहरात सुरू असेल्या सिमेंट मार्गाच्या टप्पा -१ व २ अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी जिओ-टेक या एजन्सी व्यतिरिक्त नेमण्यात आलेल्या थर्ड पार्टी ऑडिट एजन्सी संदर्भात जनमंचने माहिती विचारली होती. पत्रव्यवहार करून मागणी लावून धरली. परंतु यासंदर्भात महापालिकेने माहिती देण्यास नकार दिला. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण नसल्याने याचे थर्ड पाटीं ऑडिट करण्याची मागणी जनमंचने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सुरू असेल्या सिमेंट मार्गाच्या टप्पा -१ व २ अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी जिओ-टेक या एजन्सी व्यतिरिक्त नेमण्यात आलेल्या थर्ड पार्टी ऑडिट एजन्सी संदर्भात जनमंचने माहिती विचारली होती. पत्रव्यवहार करून मागणी लावून धरली. परंतु यासंदर्भात महापालिकेने माहिती देण्यास नकार दिला. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण नसल्याने याचे थर्ड पाटीं ऑडिट करण्याची मागणी जनमंचने केली आहे.
महापालिकेने मंजूर केलेल्या निविदेच्या अट क्रमांक ५२ मध्ये एजन्सीला शासकीय नियमाप्रमाणे कामाचे निरीक्षण करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. तसेच काम सुरू असताना मानकानुसार काँक्रिटची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र कंत्राटदाराकडून कोणत्याही नियमाचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. सिमेंट रस्त्यांना तडे गेले असून पेव्हर योग्य प्रकारे बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे सिमेंट रस्त्यांच्या थर्ड पाटी ऑडिटला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप, महासचिव नरेश क्षीरसागर, सल्लागार प्रा. शरद पाटील, मनोहर रडके, प्रल्हाद खरसने, लक्ष्मण सावलकर, मनोहर खोरगडे, राम आखरे आदींनी केली आहे.