करा योग, पळवा रोग ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:22+5:302021-06-22T04:07:22+5:30

नागपूर : जागतिक योग दिन उपराजधानीत उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध महाविद्यालय, संस्था आणि उद्यानात या निमित्त योग ...

Do yoga, escape disease () | करा योग, पळवा रोग ()

करा योग, पळवा रोग ()

Next

नागपूर : जागतिक योग दिन उपराजधानीत उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध महाविद्यालय, संस्था आणि उद्यानात या निमित्त योग प्रात्यक्षिके करण्यात आली. नियमित प्राणायाम आणि योगासने केल्यास शरीर निरोगी, स्वस्थ आणि मन शांत राहत असल्याची बाब यावेळी नागरिकांना पटवून देण्यात आली.

श्री संताजी महाविद्यालय ()

श्री संताजी शिक्षण विकास संस्थेच्या वतीने संचालित संताजी महाविद्यालयात सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य प्रिया वंजारी यांनी योग दिनाची माहिती दिली. क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय खळतकर यांनी योग वर्ग घेतला. तसेच उपस्थितांकडून सांघिक आसने करवून घेतले. आभार प्रदर्शन प्रा. विजय कांडलकर यांनी केले.

गांधीसागर कल्याणकारी संस्था ()

गांधीसागर कल्याणकारी संस्था आणि आंतरराष्ट्रीय योग अभ्यास मंडळातर्फे गांधीसागर उद्यानात जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक अ‍ॅड. अशोक यावले, नगरसेविका हर्षला साबळे, माजी नगरसेवक मनोज साबळे, प्रचार प्रमुख सियाराम चावके उपस्थित होते. प्रास्ताविक आणि संचालन गांधीसागर उद्यान संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी केले. गांधीसागर योगनृत्य प्रमुख मीना भुते यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले. अ‍ॅड अशोक यावले, नगरसेविका हर्षला साबळे, मनोज साबळे यांनी योगामुळे शरीर तंदुरुस्त राहत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.

संजीवनी प्राणायाम आणि गार्डन फ्रेंड्स ()

जागतिक योग दिनानिमित्त खोंडे उद्यानात संजीवनी प्राणायाम आणि गार्डन फ्रेंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून सुलभा क्षीरसागर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात जनार्दन स्वामी आणि हरिभाऊ क्षीरसागर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून तसेच योग गीत सादर करून झाली. यावेळी सूर्य नमस्कार आणि विविध योगासने करण्यात आले. सुलभा क्षीरसागर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अनिल मानापुरे यांनी केले. संचालन अंजना चरडे यांनी केले. आभार काशीनाथ मटाले यांनी मानले. यावेळी सुभाष राऊत, रवींद्र वैद्य, गोपालदास मोहता, प्रदीप क्षीरसागर, अशोक विरमलवार, सुनील काळे, सुरेंद्र त्रिवेदी, नरेंद्र जेठा, शुभम व्यवहारे, अजय भांडारकर, श्रीकांत हुकुम, विजया मेनकुदळे, निर्मला ठाकरे, शशिकला भुजाडे, हिरा महल्ले, सविता मेढेकर, वर्षा दुरुगकर, सुवर्णा देव आणि योग साधक उपस्थित होते.

पतंजली योग समिती () (फोटो समाचारकडुन घेणे)

कावरापेठ येथील नामदेवनगर उद्यानात परिसरातील महिलांनी पतंजली योग समितीच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिन साजरा केला. योग वर्गाची सुरुवात योग प्रचारक सूर्यकांत बारापात्रे यांनी दीपप्रज्वलनाने केली. यावेळी योग शिक्षिका लता वाकोडे, दुर्गा गौर, माया उके, किरण गजभिये, पुष्पा गुरव, ललिता बडवाईक व परिसरातील ४० महिलांनी योग, प्राणायाम केले.

विनोबा भावेनगर

विनोबा भावे नगरातील हनुमान मंदिरात योग दिन साजरा करण्यात आला. नगरसेवक गोपीचंद कृष्णराव कुमरे, नगरसेविका भाग्यश्री कानतोडे यांनी दीपप्रज्वलन करून योग शिबिराचा शुभारंभ केला. यावेळी वामन लांजेवार, भोलानाथ सहारे, भोजराज डुंबे, गणेश कानतोडे, रविदास नायक उपस्थित होते. योग गुरु सागर केडकर यांनी योगाचे धडे दिले. यावेळी कन्हैयालाल वर्मा, निळकंठ, अंबाडोरे, योगेश अमेध, सुरज नंदनवार, सुशील पराते, किशोर बुवाडे, पवन ठाकुर, बसुराज उमाठे, महेश झा, किरण गजभिये, ललिता बडवाईक, पिंकी शाह, माया उके, पुष्पा गुरव उपस्थित होते.

समाज कल्याण विभाग

जागतिक योग दिनानिमित्त समाजकल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शरीर हीच खरी संपत्ती असून सध्याच्या रासायनिक युगात शरीराला स्वस्थ ठेवायचे असेल, तर योग हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी ध्यान धारणा, योग, प्राणायाम हाच एक पर्याय आहे, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी आज केले. त्यांनी आंतराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास, योगविषयीचे महत्त्व याबाबत माहिती दिली.

निमिक्षाने शिकविले योगाचे महत्त्व

सेवाभावी मंदा बहुउद्देशीय समाज विकास संस्थेच्या वतीने योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी १४ महिन्यांची चिमुकली निमिक्षा वैरागडे हिने योग करून नागरिकांना योगाचे महत्व पटवून दिले.

श्री ओसवाल पंचायती नागपूर (फोटो समाचारकडुन घेणे)

पंतप्रधान मुद्रा लोन योजना नागपूर आणि श्री ओसवाल पंचायती नागपूरचे अध्यक्ष राकेश गांधी यांनी ऑनलाईन योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात ओसवाल पंचायती नागपूरचे माजी अध्यक्ष शांतीलाल गांधी, प्रकाशचंद दुगड, इंद्रचंद बेदमुथा, कांतीलाल श्रीमाल, प्रसन्ना दुगड, कमलेश गांधी, समता दुगड, श्वेता पारख, पूजा गांधी, सुपार्श्व गांधी, मौलिक पारख, अशोक बेदमुथा, प्रदीप रांका, महेश बेतला उपस्थित होते.

मानसरोवर ध्यानयोग व साधना केंद्र (फोटो समाचारकडुन घेणे)

जागतिक योग दिनानिमित्त नंदनवन येथील त्रिशताब्दी उद्यानात योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. मानसरोवर ध्यानयोग व साधना केंद्राच्या सदस्यांचा भाजपा प्रभाग क्रमांक १३ च्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ. सुरेश शर्मा, उमाकांत विटणकर, मनोज बैस, विनोद रेवतकर, गायत्री शर्मा, सुनीता दुर्गे, एकता कश्यप यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चंद्रकांत खंगार, दत्तात्रय शेगावकर, जीवन डवले, अनंता सयाम, अमोल तिडके, गीता इलुरकर, साक्षी दुरबुडे, प्रतिभा महाकाळकर, ममता दुवे, ममता उमरेडकर उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक मंडळ दत्तात्रयनगर (फोटो समाचारकडुन घेणे)

संत ज्ञानेश्वर उद्यान आणि ज्येष्ठ नागरिक मंडळ दत्तात्रयनगरच्या संयुक्त विद्यमाने पं. दीनदयाल उपाध्याय उद्यान रघुजीनगरात योग दिन साजरा करण्यात आला. उद्यान समितीचे प्रमुख जयंत दंडारे अध्यक्षस्थानी होते. योग शिक्षक नामदेव फटिंग यांनी नागरिकांना योगाची माहिती दिली. योग शिक्षक भास्कर राघोर्ते यांनी आयुष मंत्रालयाच्या नियमानुसार प्राणायाम करवून घेतले. संचालन गुलाब उमाठे यांनी केले. आभार प्रभाकर सावरकर यांनी मानले. यावेळी शंकर गोडबोले, पद्माकर बागरकर, राम दुरगकर, अरविंद गुंटेवार, ज्योत्स्ना सातकर, कमल गाडगे, मीनाक्षी काळे, चंदा बांगरे, पुष्पा सूर्यवंशी उपस्थित होते.

महानगरपालिका (फोटो समाचारकडुन घेणे)

जागतिक योग दिनानिमित्त महानगरपालिका आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयात योग प्राणायाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समितीचे सभापती प्रमोद भोयर, तानाजी वनवे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, राजेश भगत, रवींद्र भेलावे, मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, डॉ. रंजना लोड....................., आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर उपस्थित होते.

.............

Web Title: Do yoga, escape disease ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.