वेळेवरच पोलिसांना कारवाई का सुचते?

By admin | Published: January 10, 2015 02:44 AM2015-01-10T02:44:52+5:302015-01-10T02:44:52+5:30

नॉयलन मांज्यामुळे प्राणघातक घटना घडल्या आहे. या घटनांवर अंकुश मिळविण्यासाठी पोलिसांनी नॉयलन मांज्याच्या विक्रीवर प्रतिबंध घातला आहे.

Do you think police should take action on time? | वेळेवरच पोलिसांना कारवाई का सुचते?

वेळेवरच पोलिसांना कारवाई का सुचते?

Next

नागपूर : नॉयलन मांज्यामुळे प्राणघातक घटना घडल्या आहे. या घटनांवर अंकुश मिळविण्यासाठी पोलिसांनी नॉयलन मांज्याच्या विक्रीवर प्रतिबंध घातला आहे. मांज्या विक्रेत्यावर कायदेशीर कारवाईच्या नोटीस पोलिसांनी पाठविला आहे. पोलिसांच्या नोटीसमुळे पतंग विक्रेते दहशतीत असून, पोलिसांना ऐन सिझनच्या तोंडावर कारवाई का सुचते, असा सवाल विक्रेत्यांनी केला आहे.
शहरात लहान मोठे असे ६००० पतंग विक्रेते आहे. गेल्या तीन, चार वर्षापासून नॉयलान मांज्याची शहरात निर्माण झालेल्या दहशतीमुळे पतंग विक्रेत्यावर पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येते. पोलीस विक्रेत्यांकडून मांज्या जप्त करते. त्यामुळे विक्रेत्यांचे मोठे नुकसान होते. दरवर्षी पोलीस ऐन सिझनमध्ये अशा कारवाया करून, विक्रेत्यांचे नुकसान करीत आहे. पतंगप्रेमींकडून नॉयलान मांज्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही विक्रेत्यांनी नॉयलान मांज्यावर बॅन केल्यास, मांजा ब्लॅकमध्ये विकला जाईल. त्यामुळे विक्रेते हा मांजा विक्रीसाठी ठेवतात. पोलिसांनी मांज्या विक्रेत्यावर विरोधात वर्षभर कारवाई करावी. अन्यथा मांज्याच्या उत्पादनावर बंदी आणावी, अशी मागणीही पतंग विक्रेत्यांनी केली आहे. विक्रेत्यांनी रिद्धी-सिद्धी पतंग व्यापारी असो. या नावाने संघटना तयार केली असून, संघटनेच्या माध्यमातून पोलिसांनी कारवाई थांबवावी, अशी मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. पत्रपरिषदेला संघटनेच्या श्रद्धा शाहू, महेश गिरडे, जितेंद्र शाहू, मनोहर खापरे, भारत कनोजिया आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Do you think police should take action on time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.