वाडीत कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:08+5:302021-07-02T04:08:08+5:30

राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे कोरोना योद्धा पुरस्कार वाडीत आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा वाडी : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी ...

Doctor Glory as Corona Warrior in the Valley | वाडीत कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा गौरव

वाडीत कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा गौरव

Next

राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे कोरोना योद्धा पुरस्कार

वाडीत आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा

वाडी : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर, चार्डर्ड अकाऊंटंट, पत्रकार यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वाडी येथील मनोरमा सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रमेश बंग होते. कोरोना महामारीच्या कठीण काळात डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकत केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन बंग यांनी याप्रसंगी केले. माजी नगरसेवक राजेश जयस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे, अभय कुणावार याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी केले. संचालन ओबीसी सेलचे प्रदेश सचिव प्रा. सुरेंद्र मोरे तर आभार वाडी शहर अध्यक्ष वसंतराव इखनकर यांनी मानले. याप्रसंगी दिग्दर्शक पराग भावसार, डॉ. शैलेश चालखोर, डॉ. स्वाती चालखोर, डॉ. श्वेता झाडे, डॉ. सुनीता यादव, डॉ. राहुल पाचकवडे, डॉ. अश्विन सुळे, डॉ. राहुल भोपाळे, डॉ. गणेश डुंबरे, लेखापाल राजेश राठी, श्वेता लोहिया तसेच वाडी व दवलामेटीतील पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष (उद्योग व व्यापार) मोहन ठाकरे, मुख्याध्यापक बंडू जयस्वाल, दिनेश उके, दिलीप दोरखंडे, हिम्मत गडेकर, गणेश राठोड, प्रकाश जुनघरे, योगेश चरडे, बंटी चोखांद्रे, अरविंद बोरकर, नंदू बिडवाईक, सूर्यभान चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

010721\img_20210701_154938.jpg

फोटो

Web Title: Doctor Glory as Corona Warrior in the Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.