डॉक्टर एक मात्र प्रभार अनेक

By admin | Published: May 8, 2017 02:13 AM2017-05-08T02:13:44+5:302017-05-08T02:13:44+5:30

मोमीनुपरा येथील युनानी दवाखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र असे महापालिकेचे दोन स्वतंत्र दवाखाने आहेत.

Doctor has only one charge | डॉक्टर एक मात्र प्रभार अनेक

डॉक्टर एक मात्र प्रभार अनेक

Next

मोमीनपुरा मनपाचा दवाखाना : रुग्णांना उपचार कसे मिळणार?
गणेश हूड/आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोमीनुपरा येथील युनानी दवाखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र असे महापालिकेचे दोन स्वतंत्र दवाखाने आहेत. युनानी दवाखाना ब्रिटिश काळापासून आहे. आयुर्वेद पद्धती सारखीच ही पद्धती आहे. आजही या पद्धतीने उपचार घेण्यासाठी रुग्ण येथे येतात. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. मो. ख्वाजामोईनुद्दीन यांच्यावर लक्ष्मीनगर झोन, क्षयरोग, कुष्ठरोग, स्वाईन फ्लू व मलेरिया आदी विभागांचा अतिरिक्त प्रभार आहे. अशीच अवस्था प्राथमिक आरोग्य कें द्रातील आरोग्य अधिकारी डॉ. आरेफा अली यांची आहे. या रुग्णालयात उपचारासाठी दररोज २५ ते ३० रुग्ण येतात परंतु त्यांना नेत्र रुग्णालय, राष्ट्रीय कार्यक्रम, तसेच कार्यालयीन कामकाजही सांभाळावे लागते. त्यामुळे डॉक्टर एक प्रभार अनेक अशी अवस्था येथील डॉक्टरांची झाली आहे.
दोन्ही डॉक्टरांवर इतर विभागांचा अतिरिक्त प्रभार असल्याने दवाखान्यात उपचारासाठी येण्याऱ्या रुग्णांना न्याय मिळत नाही. येथे डॉक्टरांची गरज आहे. परंतु महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
मो.ख्वाजामोईनुद्दीन ल्क्षमीनगर झोन वा अन्य ठिकाणी गेल्यास त्यांच्या बदलीत काम पाहण्याठी डॉक्टर नाही. अशीच अवस्था आरेफा अली यांची आहे. धोबीनगर, भानखेडा, मोमीनपुरा, पाणीपेठ, मोचीपुरा, ज्योतीनगर अशा स्लम भागातील रुग्ण प्रामुख्याने या रुग्णालयात उपचारासाठी येतात. परंतु अनेकदा डॉक्टर नसल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही.
अनेकदा डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते. डॉक्टर नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.
महापालिके च्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देण्यात येते, असा दावा प्रशासनाकडून केला जातो. कुशल व अकुशल कामगारांना १४५०० ते १६५०० वेतन मिळत असल्याचा दावा केला जातो. परंतु महापालिक ा रग्णालयातील एनआरएचएम अंतर्गत काम करणाऱ्या टेक्नीशियन व परिचारिकांना ७ ते ८ हजार वेतन दिले जाते. किमान वेतन मिळत नाही. काही परिचारिका दुसऱ्या शहरातून ये-जा करतात. मानधनाच्या अर्धी रक्कम त्यांना प्रवासावर खर्च करावी लागते. अशा परिस्थितीत रुग्णावर उपचार कसे करणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

 

Web Title: Doctor has only one charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.