नागपुरातील जनतेचे डॉक्टर काळाच्या पडद्याआड : डॉ.फझल तैयब यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:07 PM2020-02-24T22:07:45+5:302020-02-24T22:08:37+5:30

शहरातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक तसेच सामाजिक सेवेसाठी ओळखले जाणारे डॉ.फझल तैयब (९५) यांचे निधन झाले. नागपुरात मागील ५० वर्षांपासून ते आरोग्य सेवा देत होते.

The 'Doctor of the People' in Nagpur: Dr. Fazal Tayeb not more | नागपुरातील जनतेचे डॉक्टर काळाच्या पडद्याआड : डॉ.फझल तैयब यांचे निधन

नागपुरातील जनतेचे डॉक्टर काळाच्या पडद्याआड : डॉ.फझल तैयब यांचे निधन

Next
ठळक मुद्दे७२ वर्षे केली रुग्णसेवा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शहरातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक तसेच सामाजिक सेवेसाठी ओळखले जाणारे डॉ.फझल तैयब (९५) यांचे निधन झाले. नागपुरात मागील ५० वर्षांपासून ते आरोग्य सेवा देत होते. ‘आयएमए’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राहिलेल्या डॉ.फझल तैयब यांनी तब्बल ७२ वर्ष वैद्यकीय क्षेत्रात ‘प्रॅक्टिस’ केली. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गरीब रुग्णांपासून शुल्क न घेता ते मोफत औषधे द्यायचे. त्यामुळेच ‘जनतेचे डॉक्टर’ म्हणून त्यांची ओळख बनली होती.
मेहदीबाग येथील निवासी डॉ.फझल तैयब हे मध्यप्रदेश येथे ‘सिव्हिल सर्जन’ होते. त्यानंतर ते नागपुरात आले व लकडगंज येथे रुग्णसेवा करत होते. त्यांनी २२ वर्ष ग्रामीण क्षेत्रांमध्ये सेवा प्रदान केली. ३२ किलोचा डिम्बग्रंथीचा ‘ट्यूमर’ त्यांनी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढला होता. अनेकदा गावात भूलतज्ज्ञ उपलब्ध नसतानादेखील ते यशस्वी शस्त्रक्रिया करत. कांजीहाऊस कब्रस्तानात त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आहे. त्यांचा नातू फैज फजल हा नामांकित क्रिकेट खेळाडू आहे.

९० वर्षाच्या वयापर्यंत खेळले क्रिकेट
डॉ.फझल तैयब यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ९० व्या वर्षाच्या वयापर्यंत ते क्रिकेट व गोल्फ खेळायचे. त्याचप्रमाणे ते आध्यात्मिकदेखील होते. रात्रभर जागून ते अरबी व उर्दूतील धार्मिक साहित्याचा अनुवाद करायचे. वय जास्त असले तरी त्यांनी अनेक मोठ्या यात्रा केल्या. ते शायरी, संगीत व साहित्यप्रेमीदेखील होते.

Web Title: The 'Doctor of the People' in Nagpur: Dr. Fazal Tayeb not more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.